Horoscope Today, Daily Horoscope, Rashibhavishya, 23 May 2023: राशीभविष्यानुसार, आज 23 मे 2023, मंगळवारचा दिवस अत्यंत चांगला आहे. आज मेष राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही असेल, तर तूळ राशीच्या लोकांसाठी व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील, तसेच त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा त्यांना नक्कीच फायदा होईल. मेष ते मीन राशीसाठी मंगळवारचा दिवस कसा राहील? जाणून घ्या तुमच्या राशीनुसार आजचं राशीभविष्य... (Rashibhavishya in Marathi)


मेष (Aries)


मेष राशीच्या लोकांच्या आजच्या दिवसाबाबत बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्हाला व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. व्यावसात भागिदारीचा विचार करत असाल तर आजचा दिवस योग्य आहे. झटपट निर्णय घ्या, उगाच वेळ काढत बसू नका. हा निर्णय तुमच्यासाठी नक्कीच लाभदायी ठरेल. नोकरी करत असाल तर तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीसा ताण असेल, पण तुम्ही आत्मविश्वासानं सर्व ताण दूर करालच, पण कामंही पूर्ण कराल. तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण कराल आणि याच जोरावर वरिष्ठांची मनं जिंकाल. तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर महत्त्वाची जबाबदारीही मिळवाल. 


कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतील, मात्र तुम्हाला संयम बाळगावा लागेल, तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. आज तुमच्या आयुष्यात एखाद्या नव्या व्यक्तीचं आगमन होऊ शकतं. तुमच्या आयुष्यभराचा जोडीदार म्हणून तुम्ही या व्यक्तीची निवड करु शकता. तसेच, तुम्ही जर नव्या उत्पन्नाच्या शोधात असाल तर अनेक नव्या संधी उपलब्ध होतील. हा पण तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. 


आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. तसेच, कोणत्याही कामात तुम्हाला मिळालेली तुमच्या जोडीदाराची साथ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. घरात एखाद्या धार्मिक कार्याचा योग जुळून येईल.  भावा-बहिणींचंही तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामात पूर्ण सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात व्यत्यय येऊ शकतो. एखाद्या जुन्या मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्यासोबत असल्यानं तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या कुरबुरी जाणवतील. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका आणि काळजी घ्या.  


वृषभ (Tauras)


जर तुमची रास वृषभ असेल तर तुम्ही आज निश्चिंत राहा. तुमचा आजचा दिवस आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. नोकरदारांबद्दल बोलायचं झालं तर आज तुमच्या नोकरीत तुम्हाला बढतीची संधी मिळेल. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर मात्र आज तुम्हाला थोडंसं जपून वागावं लागेल. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याचा रोष सहन करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. व्यावसाय करत असाल तर आज मित्रांनी दिलेला सल्ला अजिबात धुडकावून लावू नका. आज तुमच्या मित्राच्या एका सल्लानं तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती म्हणून परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. 


विद्यार्थी असाल तर अभ्यासाकडे लक्ष द्या. कोणत्याही स्पर्धेची किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर खूप प्रयत्न करावे लागतील. प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, पण अजिबात चिंता करु नका, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. तुमच्या व्यावसायासाठी तुमच्या कुटुंबियांकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते. तुम्हाला पालकांचं सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन मगच बाहेर पडा, तुमची सर्व कामं निर्विघ्नपणे पूर्ण होतील.


तसा आजचा दिवस तुमचा काहीसा व्यस्त असेल, पण तुमच्या सर्व कामांमधून तुमच्या मुलांसाठी नक्की वेळ काढा. तुम्ही त्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करू शकता आणि त्यांना बाहेर फिरायलाही घेऊन जाऊ शकता. त्यामुळे मुलांसोबतच्या नात्यातील दुरावा काहीसा कमी होण्यास मदत होईल. भाऊ-बहिणीच्या उच्च शिक्षणासाठी तुम्हाला आर्थिक मदत उभी करावी लागेल, त्यासाठी नातेवाईक स्वतःहून पुढाकार घेऊन तुम्हाला मदत करतील. तुमच्या लग्नासाठी बोलणी सुरू असतील तर समोरून होकार येऊ शकतो. 


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. जर तुम्ही व्यावसाय करत असाल, तर व्यावसायात नव्या योजना सुरू करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. तसेच, मोठा आर्थिक नफाही होईल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल, तसेच वरिष्ठ तुमच्या कामामुळे तुमच्यावर खूश होतील. याचाच अर्थ यावेळी तुमचं प्रमोशन नक्की होईल. 


काही अडचणींवर काढलेल्या तोडग्यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक नफा होईल. तसेच, जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून कुठे अडकले असतील, तर ते आज मिळालेच म्हणून समजा. काही कामांची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाईल. त्यामुळे तुमची धावपळ होईल, थकवा येईल, पण तुम्ही काम यशस्वीरित्या पूर्ण कराल. व्यासायात प्रगती होईल. बऱ्याचकाळापासून वडिलोपार्जित जमिनीचा निकाल तुमच्याबाजूनं लागेल. आजच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढाल आणि तुमच्या आवडीचं एखादं काम करण्यात तो वेळ घालवाल. त्यामुळे मनाला शांती मिळेल. 


कुटुंबातील सदस्य तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक करतील. जोडीदारासोबतचा तुमचा संपूर्ण दिवस अत्यंत उत्साही असेल. कुटुंबाच्या कल्याणासाठी जोडीदारासोबत मिळून महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. घरबसल्या पार्टटाईम ऑनलाईन काम करत असाल, तर आर्थिक लाभ होईल.


कर्क  (Cancer)


तुमची रास कर्क असेल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असेल. तुमच्या खूप दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वडिलोपार्जित मालमत्तेचा निकाल लागून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला आज अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागलीत, पण यामध्ये तुमच्या कुटुंबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. त्यामुळे तुम्हाला अगदी ठामपणे निर्णय घेण्याचं बळ मिळेल आणि तुम्ही योग्य निर्णय घ्याल. तसेच, तुमचे बऱ्याच काळापासून रखडलेले पैसे मिळतील. व्यावसायिक असाल तर आजचा दिवस फक्त आणि फक्त तुमचाच आहे, असं समजा. व्यावसायाची भरभराट होईल, आर्थिक नफा मिळवून देणारी अनेक मोठी कामं तुमच्याकडे येतील. काही कामांमुळे आजचा दिवस तसा व्यस्त असेल, पण काहीसा वेळ कुटुंबासाठी नक्की काढाला. 


तुमचे विरोधक तुमच्या कामांमध्ये अडथळे आणण्याचे अनेक प्रयत्न करतील, पण तुमच्या आत्मविश्वासापुढे त्यांची कोणतीही युक्ती चालणार नाही. तुमची सर्व कामं तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. तुम्हाला आज लांबचा प्रवास घडू शकतो. तसेच, प्रवासात एखाद्या खास व्यक्तीसोबतही तुमची भेट होऊ शकते. ही व्यक्ती तुमच्या अनेक कामांमध्ये मदत करु शकते. भावा-बहिणीच्या लग्नातील अडथळे दूर होतील. घरात शुभकार्याची तारीख ठरेल. 


आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील, यामध्ये काही आव्हानं नक्कीच येतील, पण त्यावर मात करुन तुम्ही सर्व कामं पूर्ण करण्यात यशस्वी ठराल. समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी कामं करण्याची संधी मिळेल. आज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. 


सिंह (Leo)


सिंह राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीमध्ये नव्या जबाबदाऱ्या मिळतील. हा मात्र तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल. नको त्या चिंतेनं मन अस्वस्थ होईल. मेहनतीनंतरच तुम्हाला व्यवसायात यश मिळेल. तुमच्या कुटुंबियांकडून तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत मिळेल. आज तुम्ही एखाद्या मालमत्तेत गुंतवणूकही करू शकता.


तुमच्या जोडीदारानं केलेल्या प्रगतीमुळे आयुष्यात अनेक आनंदाची गोष्टी घडली, आर्थिक लाभही मिळेल. नोकरीच्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील, परंतु तुमचे उच्च अधिकारी तुम्ही केलेल्या कामांमुळे खूप खूश होतील. मित्रांच्या मदतीनं तुम्हाला उत्पन्नाचं काही नवं साधन मिळेल, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. 


परदेशातून आयात-निर्यातीचं काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवाल आणि तुमची सुख-दु:खं शेअर करताना दिसतील. सर्वजण एकत्र कुठेतरी जाण्याचा बेतही आखतील. 


कन्या (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात असतील, त्यांना आज एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीनं चांगली नोकरी मिळू शकते. तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी असतील, तर त्या दूर करण्यासाठी तुमचा भाऊ एखाद्या देवदूतासारखा धावून येईल. नातेवाईकांच्या मदतीनं तुमचा भाऊ तुमच्या सासरच्या सर्व अडचणी दूर करेल. आज घरी एखादं मंगल कार्याचं आयोजन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुमच्या घरी पाहुणेही येतील, त्यामुळे पाहुणचार करण्याची तयारी ठेवाल. घराच्या दुरुस्तीसह घरातील काही सामान खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागेल. तसेच, मित्रमंडळींसह किंवा घरातील सदस्यांसह खरेदीसाठी किंवा सहलीसाठी जाण्याचा प्लानही होऊ शकतो. खूप दिवसांनी आई-वडिलांसोबत निवांतपणे वेळ घालवण्याची संधी मिळेल. 


आज तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. घरातील सदस्यासाठी एखादी महागडी गोष्ट घ्यावी लागेल. आज एक काळजी घ्या, कोणत्याही व्यक्तीवर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका. कारण आज तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. तसेच, आज तुमच्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्याची संधी मिळेल. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर राहून, आज तुम्ही आनंदाच्या शोधात आध्यात्मिक गुरूला भेटायला जाऊ शकता.  संगीत, नृत्य आणि बागकाम यांसारख्या तुमच्या छंदांसाठीही वेळ काढा, यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. 


तूळ (Libra)


तूळ राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. जे व्यवसाय करत आहेत त्यांना यश मिळेल. मित्रांच्या मदतीनं नव्या ओळखी होतील त्याचा लाभ तुम्हाला व्यावसाय वाढवण्यासाठी होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुम्हाला ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीनं रखडलेले पैसे मिळतील. एखाद्या घटनेमुळे कायद्याच्या कचाट्यात अडकला असाल, तर तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडाल. जर तुम्ही कर्जासाठी अर्ज केला असेल, तर तुमचं कर्ज मंजूर केलं जाईल. 


बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या कुरबुरी सतावतील. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास बरं होईल. आज तुमची पदाची, अधिकाराची महत्त्वाकांक्षा बर्‍याच प्रमाणात पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला कुठूनतरी चांगली ऑफर मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद होण्याची शक्यता आहे. मोठ्या भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. 


आजचा दिवस काहीसा उत्साहाचा असेल. घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. कोणत्याही कामात जोडीदार ठामपणे पाठिशी उभा असेल. धार्मिक कार्यक्रमात मनःशांती मिळेल. आज तुमची सर्व कामं पूर्ण होतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत कराल.


वृश्चिक (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल बोलाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही कराल. कोणत्याही सरकारी संस्थेकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 


नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर किंवा प्लॉट घेण्याचा विचार करत असलेल्या योजना यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कुठल्यातरी पक्षात, समारंभात सर्व लोक एकत्र येतील, तिथे सर्व लोकांशी सलोखा राखला जाईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत.


अविवाहित लोकांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल, त्यामुळे घरात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल. आज तुम्ही तुमच्या सर्व खर्चाचं नियोजन केलं तर ते तुमच्यासाठी फायद्या राहिल, व्यवसायात काही बदल करण्याचीही योजना कराल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. संमेलनांना संबोधित करण्याचीही संधी मिळणार आहे.


धनु (Sagittarius)


जर तुम्ही धनु राशीचे असाल तर आजचा दिवस फक्त तुमचाच आहे असं समजा. ऑफिसमध्ये बॉसकडून मिळालेल्या सर्व जबाबदाऱ्या वेळत आणि व्यवस्थित पार पाडाल. बॉसकडून तुमच्यावर विश्वास दाखवून तुमच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपावल्या जातील. जर तुमचा बिझनेस असेल तर आर्थिक फायद्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. निर्णय घेताना पूर्णपणे विचारपूर्वक घ्या, नाहीतर नुकसान होण्याचा धोकाही आहे. 


तुमच्या घरातील ज्येष्ठांकडून तुमच्या बिझनेससाठी आर्थिक मदत मिळू शकते. महत्त्वाच्या कामांमध्ये कुटुंबातील सदस्य पाठीशी ठामपणे उभे राहतील, तसेच त्यांचं सहकार्य मिळेल. कौटुंबिक सदस्यांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग आहे. तुमच्या स्वभावातील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे, तुमची विनोदबुद्धी. तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल तो दूर करण्यासाठी तुमच्या तुम्ही तुमच्या स्वभावातील याच गुणाचा वापर करु शकता. 


बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. तसेच, मुलांना अभ्यासात तुमची गरज भासेल. यामुळे मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी तुमच्याकडे असेल त्यामुळे त्यांना नाही न म्हणता, त्यांची मदत करा. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधीही आज तुम्हाला मिळेल. तसेच, एखादा जुना मित्र किंवा मैत्रीणीची खूप दिवसांनी भेट होईल. आज फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. 


मकर (Capricorn)


जर आपण मकर राशीच्या लोकांबद्दल बोललो तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तब्येतीच्या कुरबुरी सतावतील. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास बरं होईल. नोकरीत बदलाच्या संधी मिळू शकतात. आज काही कामानिमित्त वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. व्यवसायात वाढ होईल. मेहनत जास्त करावी लागेल. राजकारणात यश मिळेल. राजकीय नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल.


जे कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होतील, ज्यामध्ये ते जिंकतील. घरात पूजा आणि पाठही आयोजित केले जातील, ज्यामुळे नातेवाईक ये-जा करतील. कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल, थोडा वेळ घालवाल, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यात मदत करेल. मित्रांच्या मदतीनं उत्पन्नाच्या संधीही उपलब्ध होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घ्या. 


कुंभ (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडाल. एखाद्या जुन्या मित्राच्या घरी मेजवानीसाठी बोलावणं येईल, तिथे जाणं अजिबात टाळू नका, कारण तिथे तुमच्या सर्व जुन्या मित्रमंडळींशी भेटीगाठी होतील. आज तुमची एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल. जी व्यक्ती तुमचे खूप दिवसांपासून रखडलेले पैसे मिळवण्यात खूप मदत करेल. तुमच्या जोडीदारानं केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरी पूजा किंवा एखाद्या शुभकार्याचं आयोजन करणं अत्यंत शुभ ठरेल. आजच्या दिवसात तुम्हाला पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल.


तुमच्या जवळच्या काही लोकांना आज महत्त्वाचे निर्णय घेण्यास भाग पाडलं जाईल, ज्यामुळे तुम्ही तणावात आणि चिंतेत असाल. आर्थिक लाभ होण्याचाही योग आज तुमच्या राशीत आहे. आर्थिक फायदा झाल्यामुळे घरातील आवश्यक वस्तूंची खरेदी कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असेल. तुमच्या जोडीदारासोबत काही आनंदाचे क्षण तुम्हाला घालवता येतील. 


आज काही धार्मिक ग्रथांची खरेदी करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे तुमच्या मनातील तणाव दूर होऊन तुम्हाला शांती मिळेल. घरात तुमचं लग्न जमवण्याची लगबग सुरू असेल, तर आज तुम्हाला नक्कीच आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देऊन अधिकाधिक वेळ अभ्यासाला देण्याचा प्रयत्न करावा. 


मीन (Pisces)


जर तुमची रास मीन असेल तर आजचा दिवस फक्त आणि फक्त तुमचाच आहे, असं समजा. थोरामोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल. तसेच, आज मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. बऱ्याच काळापासून दिलेली उधारी तुम्हाला आज परत मिळेल. जर तुम्ही एखादी गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पुरेपुर फायदा मिळेल. तसेच नव्या गुंतवणुकीची संधीही असेल, फक्त गुंतवणूक करताना विचारपूर्वक कराल. खूप दिवसांनी तुम्ही भावंड एकत्र याल आणि वेळ घालवाल. 


जवळच्या नातेवाईकांच्या घरच्या समारंभाला हजेरी लावाल, त्यामुळे नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या मदतीनं तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. आजच्या दिवशी तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल. नाहीतर भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयांमुळे भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी जरा जपून वागा, तुम्ही सहज केलेली कृती एखाद्याच्या मनावर वार करेल आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. व्यावसायात एखादा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या नाहीतर यामुळे पश्चाताप करावा लागेल. कौटुंबिक समस्या सोडवण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल. 


आज तुमचा दिवस तसा निवांत असणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर मोकळ्या वेळेत कोणतीही वेब सिरीज पाहू शकता. तुमच्या घरातील गोष्टी तुमच्या परिचितांना सांगू नका. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे कराल.