India Weather Update: आठवडाभर  उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज दिलासा मिळणार आहे. बुधवारी राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला आहे.   पुढील चार ते पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.  आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार आसाम आणि मेघालयच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. तर जम्मू काश्मीर, लडाख, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशसह सिक्किममध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


हिमाचल प्रदेशमध्ये यलो अलर्ट


तर डोंगराळ भागात हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. उत्तराखंडच्या अनेक भागात सध्या वातावरण खराब आहे. केदारनाथ, तुंगनाथ, मध्यमहेश्वर, कार्तिक स्वामीसह उंच  डोगराळ भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरू असून खराब वातावरणामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केदारनाथमध्ये पावसामुळे भाविकांना अनेक अडचणी येत आहेत. तर हिमाचल प्रदेशच्या हवामान विभागाने आज आणि उद्या यलो अलर्ट जारी केला आहे. जोरदार वाऱ्यासह  पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.


उत्तरप्रदेशमध्ये 26 मे पर्यंत पावसाची शक्यता


राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे. या पावसाच्या गारव्यामुळे  उकाड्याने हैराण झालेल्या दिल्लीकरांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे. तर उत्तरप्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 26 मे पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान वारे प्रतितास 40-45 किलोमीटर  वेगाने वाहण्याची शक्यता आहे.






विदर्भात 5 दिवस पावसाचा अंदाज, काही जिल्ह्यात घामाच्या धारा 


 महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होताना दिसून येत आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.   एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे पाऊस असं विचित्र वातावरण सध्या राज्यात दिसून येतंय. मान्सून दाखल होईपर्यंत ही विचित्र परिस्थिती कायम राहणार असल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे.


 हे ही वाचा :