देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


अमेरिकेनं विमानतळावर पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर, बायडेन दाम्पत्याकडून पंतप्रधानांचं व्हाईट हाऊसमध्ये स्वागत 


 पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. न्यूयॉर्कमधील योगदिनाचा कार्यक्रम आटोपून मोदी वॉशिंग्टन डीसीमध्ये दाखल झाले. तिथं मोदींचं शाही स्वागत करण्यात आलं. पंतप्रधानांना अमेरिकेनं विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. (वाचा सविस्तर) 


 Weather Update : देशातील काही भागात पावसाची हजेरी, उष्णतेपासून नागरिकांना दिलासा; वाचा हवामान विभागाचा अंदाज


 देशातील वातवरणात बदल होत आहे. काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावल्यामुळं नागरिकांना उष्णतेपासून (Heat) दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश (UP) आणि बिहारमध्ये (Bihar) पावसानं हजेरी लावली आहे. उष्णतेच्या लाटेनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडल्यानं उष्णतेचा प्रकोप कमी झाला आहे.(वाचा सविस्तर)


शाकाहारी मेन्यू , तिरंगा थीम डायनिंग सजावट;पंतप्रधान मोदींसाठी आज व्हाईट हाऊसमध्ये विशेष डिनरचं आयोजन 


 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Modi) अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदींसाठी आज व्हाईट हाऊसमध्ये विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी मोदींचं आदरातिथ्य केलं. मोदींसाठी संपूर्ण शाकाहारी मेनू ठेवण्यात आला आहे. (वाचा सविस्तर)


 मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! गाडीमध्ये बॉम्बस्फोट, तीन जण जखमी 


भारताच्या ईशान्येकडील मणिपूर (Manipur) राज्यात हिंसाचार (Violence) थांबण्याचं नाव घेत नाही. मणिपूरमध्ये एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता येथे एका पुलाजवळ उभ्या असलेल्या एसयूव्हीमध्ये बॉम्बस्फोट झाला, यामुळे तीन नागरिक जखमी झाले आहेत.  (वाचा सविस्तर)


 रोजगाराच्या संधी वाढणार! केंद्राकडून सुमारे 300 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी 


केंद्र सरकारने सुमारे 300 कोटी रुपयांच्या अमेरिकन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतीयांना आता रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने मायक्रॉन या सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपनी भारतात विस्तार करण्यास परवानगी दिली आहे. (वाचा सविस्तर)


टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी अजूनही बेपत्ता, पाकिस्तानी अब्जाधीशासह 5 जणांचा जीव धोक्यात


 टायटॅनिकचे (Titanic) अवशेष पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी अद्याप बेपत्ता (Titan Submarine Missing) आहे. या पाणबुडीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे या बेपत्ता पाणबुडीतील पाच प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. या पाणबुडीत फक्त काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याने धोका वाढत आहे. (वाचा सविस्तर)


 नोकरीमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण, चाफेकरांनी रँडला गोळ्या झाडल्या, इतिहासात आज


आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 22 जून रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. (वाचा सविस्तर)


Horoscope Today 22 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य 


आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांना नोकरीत अधिका-यांची साथ मिळेल, पण बदली होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? (वाचा सविस्तर)