Weather Update : देशातील वातवरणात बदल होत आहे. काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावल्यामुळं नागरिकांना उष्णतेपासून (Heat) दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश (UP) आणि बिहारमध्ये (Bihar) पावसानं हजेरी लावली आहे. उष्णतेच्या लाटेनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडल्यानं उष्णतेचा प्रकोप कमी झाला आहे. तर 25 जूनपासून देशातील अनेक राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


27 जूनपर्यंत दिल्लीत पावसाची प्रक्रिया सुरु राहणार


देशातील काही राज्यात पाऊस पडत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळं काही राज्यात पावसाचा जोर अधिक आहे. तर काही राज्यामध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. केरळमध्येही पाऊस सुरु आहे. पुढचे दोन दिवस केरळमध्ये चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार दिल्लीत 27 जूनपर्यंत पावसाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. तर तापमानात 4 अंशांची घसरण नोंदवली जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


आज या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा


बिपरजॉय चक्रीवादळामुळं राजस्थानमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. 25 जूनपासून राजस्थानच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, जयपूर, काउंट, दौसा, कोटामध्ये हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. आसाम, मेघालय, बिहार, झारखंड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश आणि किनारी आंध्र प्रदेशमधील काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील काही दिवसात उत्तर भारतातील कमाल तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसने घसरण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. 
 


Maharashtra Rain : महाराष्ट्रात उद्यापासून पावसाची शक्यता


राज्यातील वातावरणात सतत बदल (Climete Change) होत आहे. काही भागात उन्हाचा तडाखा जाणावत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून (23 जून) राज्यातील काही भागात पावसाचा (Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. तर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम (Kharip Crop News) अडचणीत आल्याचं चित्र आहे. बळीराजा आकाशाकडे डोळे (Maharashtra Rain Update) लावून बसला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : दिलासादायक! उद्यापासून राज्यात पावसाचा अंदाज, 24 जूनपासून जोर वाढणार