PM Modi Dinner at White House: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Modi) अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदींसाठी आज व्हाईट हाऊसमध्ये विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी मोदींचं आदरातिथ्य केलं. मोदींसाठी संपूर्ण शाकाहारी मेनू ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये grilled corn kernel salad, portobello mushrooms आणि केशरयुक्त risottoचा समावेश आहे. डेसर्टसाठी मोदींना strawberry shortcake ऑफर करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी व्हाइट हाउसमध्ये स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले. मोदींसाठी आयोजीत स्टेट डिनरचा प्रीव्यू अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडन यांनी माध्यमांसमोर मांडला. शेफ नीना कुर्टिस यांनी जेवण बनवले. पंतप्रधान मोदींसाठी व्हाईट हाऊसचे कार्यकारी शेफ क्रिस कॉमर फोर्ड आणि व्हाईट हाऊसचे कार्यकारी पेस्ट्री शेफ सूसी मॉरिसन यांनी डिनरचा मेन्यू तयार केला.
जिल बायडेन यांनी सांगितले की, रात्रीच्या जेवणानंतर ग्रॅमी पुरस्कार विजेते जोशुआ बेल यांच्या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील एक गट भारतीय संगीत सादर करणार आहेत. व्हाईट हाऊसच्या साऊथ लेनमध्ये रात्रीचे जेवण होणार आहे. डिनर जिथे केला जाणार आहे ती जागा तिरंगा थीमने सजवली आहे. तसेच जेवणाचा टेबल हिरव्या रंगात सजवला आहे. त्याच टेबलावर भगव्या रंगाची फुले ठेवला जाणार आहे.
डिनरमध्ये असणार हा मेन्यू
- लेमन डिल योगर्ट सॉस
- क्रिस्प्ड मिलेट केक
- समर स्कावशेश
- मॅरिनेटेड मिलेट
- ग्रिल्ड कॉर्न कर्नल सलाड
- कंप्रेस्ड वॉटरमेलन
- टँगी एवाकाडो सॉस
- स्टफ्ड पोर्टोबेल्लो मशरूम
- क्रीमी सैफरॉन इन्फ्यूस्ड रिसोट्टो
- रोज अॅन्ड कार्डामोन- इनफ्यूस्ड स्ट्रॉबेरी शॉर्टकेक
गेस्ट शेफ नीना कर्टिस यांनी सांगितले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खूप आतुरतेने वाट पाहत आहे. आंतरराष्ट्रीय भरड वर्ष साजरे केले आहेत. हे लक्षात घेऊन डिनरमध्ये खास मॅरीनेट केलेल्या बाजरीचा समावेश करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
International Yoga Day at UN: जिथं मोदी तिथं विक्रम...योग दिनाच्या कार्यक्रमाने संयुक्त राष्ट्र मुख्यालय गिनिज बुकात; वाचा नेमकं काय झालं?