PM Modi US Visit:  पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. न्यूयॉर्कमधील योगदिनाचा कार्यक्रम आटोपून मोदी वॉशिंग्टन डीसीमध्ये दाखल झाले. तिथं मोदींचं शाही स्वागत करण्यात आलं. पंतप्रधानांना अमेरिकेनं विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी  व्हाईट हाऊसला पोहचले. व्हाईट हाऊसमध्ये  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी त्यांचे दिमाखात स्वागत केले.


बायडेन दाम्पत्य मोदींना अमेरिकन बुक गॅलरी भेट देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यानंतर मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डीनरचे आयोजन करण्यात आले आहे. ANI या  वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसतर्फे मोदींना खास भेट देण्यात येणार आहे.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन पंतप्रधान मोदींना 20 व्या शतकातील   हाताने बनवलेली प्राचीन अमेरिकन बुक गॅलरी भेट देणार आहे.  यासोबतच राष्ट्राध्यक्ष बायडन पंतप्रधान मोदींना विंटेज अमेरिकन कॅमेरा देणार आहेत. यासोबत  बायडन यांच्या तर्फे मोदींना अमेरिकन वाइल्डलाइफ फोटोग्राफीचे हार्डकव्हर पुस्तकही  दिले जाणार आहे.तर फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या तर्फे रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या संग्रहित कवितांच्या पहिल्या आवृत्तीचे पुस्तक पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिले जाईल.






नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन


अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्यासह मोदी एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. हा भारतीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमता धूम स्टुडिओचे कलाकार सहभागी आहेत. धूम स्टुडिओ हा एक भारतीय डान्स स्टुडिओ आहे. जो भारतातील नृत्य पंरपरा आणि संस्कृतीशी संबंधित आहे.


मोदींना गार्ड ऑफ ऑनर


पंतप्रधानांना अमेरिकेनं विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या प्रसंगी अमेरिकन सरकारचे वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे मोदींचं विमान लँड झालं तेव्हा पाऊस पडत होता. मात्र भर पावसातसुद्धा गार्ड ऑफ ऑनर मोठ्या दिमाखात पार पडला. आपल्यावर इंद्रदेवता प्रसन्न आहे, असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये देखील म्हटलं आहे.