देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. Weather Update : हिमाचल-उत्तराखंडमध्ये 'जलप्रलय' तर, पंजाब- हरियाणात 15 जणांचा पावसामुळे मृत्यू; IMD कडून सतर्कतेचा इशारा
Weather Update Today : देशभरात पावसाने (Rain) यावेळी कहर केला आहे. हिमाचलमध्ये मुसळधार पावसानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. याशिवाय उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळतेय. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे झालेल्या या विध्वंसानंतर मदत आणि बचाव कार्य तीव्र करण्यात आले असून एनडीआरएफच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात रेड अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस्तर
2. UN Report : दिलासादायक! 15 वर्षांमध्ये भारतातील 41 कोटी नागरिक दारिद्र्यातून बाहेर, संयुक्त राष्ट्राचा अहवाल
UN Report On Poverty : संयुक्त राष्ट्रानं (United Nations) एक महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारताची कामगिरी सुधारल्याचा उले्लेख करण्यात आला आहे. भारताने गरीबीवर मात करण्याच्या दृष्टीने एक मोठी कामगिरी केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रानं या अहवालात दिली आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये भारतातील 41.5 कोटी नागरिक दारिद्र्यातून बाहेर आल्याचं यूएनने (UN)आपल्या अहवालात म्हटलं आहे. वाचा सविस्तर
3. शक्तिशाली, वेगवान अन् शत्रूला चकवा देण्यास सक्षम; जाणून घ्या, नौदलाच्या ताफ्यात सामील होणाऱ्या Rafale M ची वैशिष्ट्ये
पंतप्रधान मोदी या आठवड्यात दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जात आहेत. यादरम्यान ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत राफेल-एम (Rafale-M) करारावर स्वाक्षरी करू शकतात. वाचा सविस्तर
4. Petrol-Diesel Price: काही जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत किरकोळ बदल; तुमच्या शहरांतील किमती काय?
Petrol Diesel Rate Today 12th July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर (Crude Oil) आज स्थिरच आहेत. WTI क्रूड 0.01 डॉलरनं घसरलं असून प्रति बॅरल 74.82 डॉलरवर विकलं जात आहे. तसेच, ब्रेंट क्रूड 0.02 डॉलरनं घसरून 79.38 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. देशातील तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. दरम्यान, भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किमती बदलल्या जातात. यापूर्वी जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती. वाचा सविस्तर
5. Malala Day 2023 : आज 'जागतिक मलाला दिन'; जाणून घ्या सर्वात तरूण नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजईविषयी महत्त्वाचे मुद्दे
Malala Day 2023 : युवा कार्यकर्त्या मलाला यूसुफजईचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 12 जुलै हा दिन 'जागतिक मलाला दिन' म्हणून घोषित केला. जगभरातील महिला आणि मुलांच्या हक्कांचा सन्मान करण्यासाठी मलाला युसूफजईचा जन्मदिन मलाला दिन म्हणून साजरा केला जातो. मलालाने तिच्या आयुष्यात अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. मलालाने निर्धाराने महिलांच्या सन्मानासाठी आणि शिक्षणासाठी दहशतवादी तालिबान्यांशी लढा दिला. वाचा सविस्तर
6. IND vs WI Preview : रोहित ॲण्ड कंपनीपुढे कॅरेबिअन आर्मीचे आव्हान, कोण मारणार बाजी?
IND vs WI 1st Test 2023 Preview : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील पराभवाला मागे टाकत भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरत आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात भारतीय संघ करणार आहे. नव्या उमेदीने टीम इंडिया मैदानात उतरेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पहिल्यांदा न्यूझीलंडकडून आणि यंदा ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता वेस्ट इंडिजविरोधात आपल्या पुढील अभियानाला टीम इंडिया सुरुवात करत आहे. यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेशकुमार यासारख्या युवा खेळाडूंना संधी देऊन संघ बांधणीस भारताने सुरुवात केली आहे. नवे खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये कशी कामगिरी करतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. वाचा सविस्तर
7. 12th July In History: करारी आवाज अन् भेदक नजर... बॉलिवूडचा 'प्राण; गेला, प्रभातचा चंद्रसेना चित्रपट प्रदर्शित; आज इतिहासात
12th July In History: भारतीय चित्रपटसृष्ठीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये खलनायकाची भूमिका आजरामर करणाऱ्या प्राण यांचं निधन आजच्याच दिवशी म्हणजे 12 जुलै 2013 रोजी झालं. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला प्रभात फिल्म कंपनीचा चंद्रसेन हा चित्रपट आजच्याच दिवशी, 12 जुलै 1935 रोजी प्रदर्शित झाला होता. देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 12 जुलै रोजी घडलेल्या आणखी काही घटना पुढीलप्रमाणे आहेत, वाचा सविस्तर
8. Horoscope Today 12 July 2023 : मेष, कन्या आणि तूळ राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नयेत; जाणून घ्या सर्व राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 12 July 2023 : आज बुधवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. तर, कन्या, मकर राशीसाठी आजचा दिवस तितका लाभदायक नसणार आहे. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशीबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर