UN Report On Poverty : संयुक्त राष्ट्रानं (United Nations) एक महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारताची कामगिरी सुधारल्याचा उले्लेख करण्यात आला आहे. भारताने गरीबीवर मात करण्याच्या दृष्टीने एक मोठी कामगिरी केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रानं या अहवालात दिली आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये भारतातील 41.5 कोटी नागरिक दारिद्र्यातून बाहेर आल्याचं यूएनने (UN)आपल्या अहवालात म्हटलं आहे.


जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात गरीबीचे प्रमाणही मोठे आहे. मात्र, भारताने गरीबीवर मात करण्याच्या दृष्टीने एक मोठी कामगिरी केली. गेल्या 15 वर्षांमध्ये भारतात गरीबीचं प्रमाण कमी झाल्याचं संयुक्त राष्टानं एका अहवालात सांगितलं आहे. 2005-06 ते 2019-21 या कालावधीमधील ही आकडेवारी असल्याचं यूएनच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. भारताबरोबरच आणखी 25 देशांनी या काळात आपल्या गरीबी इंडेक्समध्ये सुधारणा घडवून आणली आहे. वैश्विक बहुआयामी गरीबी इंडेक्सने (Multidimensional Poverty Index) ही आकडेवारी जारी केली आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि ऑक्सफोर्ड गरीबी आणि मानव विकास मोहीम (OPHI) या संस्थांनी ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीमध्ये ही माहिती देण्यात आली.


81 देशांचा समावेश 


भारताप्रमाणेच गरिबी निर्देशांकात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये चीन, कंबोडिया, काँगो, होंडुरास, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने (UNDP) दिलेल्या माहितीनुसार  2000 ते 2022 पर्यंत वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर हा अहवाल समोर आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत एकूण 81 देशांचा सहभाग होता. यामध्ये लोक त्यांचे दैनंदिन जीवन कसे जगत आहेत, शिक्षण आणि आरोग्याची उपलब्धता किती आहे. घर, पिण्याचे पाणी, वीज यासारख्या सुविधांवरही नजर ठेवण्यात आली होती.


2019-21 या कालावधीमध्ये गरिबीची टक्केवारी 16.4 


2005-06 साली देशातील गरीबांची टक्केवारी 55.1 टक्के होती, जी 2019-21 या कालावधीमध्ये केवळ 16.4 टक्के एवढी झाली. 2005-06 साली देशातील बहुआयामी गरीबांची संख्या 64.5  कोटी होती. तर,2015-16 साली ही संख्या 37 कोटींवर पोहोचली. त्यानंतर 2019-21 या वर्षीपर्यंत ही संख्या केवळ 23 कोटींवर आली असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. 


या गोष्टीही सुधारल्या


संयुक्त राष्ट्राच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पोषणापासून वंचित असलेले लोक 2005-06 मध्ये 44 टक्के होते ते प्रमाण आता 2019-21  मध्ये 12 टक्क्यांपर्यंत कमी झाले. बालमृत्यू दर 4 टक्क्यांवरुन 1.5 टक्के झाला आहे. स्वच्छतेपासून वंचित असलेले लोकांची संख्या 50 टक्क्यांवरुन 11.3 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. या 15 वर्षांत पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या लोकांची संख्याही 16 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Vidur Niti : विदुर नीतीच्या 'या' 10 गोष्टी  माणसाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देतात, गरिबी आणि आर्थिक संकट होते दूर