शक्तिशाली, वेगवान अन् शत्रूला चकवा देण्यास सक्षम; जाणून घ्या, नौदलाच्या ताफ्यात सामील होणाऱ्या Rafale M ची वैशिष्ट्ये
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी 26 राफेल सागरी लढाऊ विमानं (Rafale-M) खरेदी करण्यासाठी अब्ज डॉलरच्या कराराची घोषणा करू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यात INS विक्रांतचे वाहक म्हणून 26 राफेल-मरीन फयटर्सच्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत.
याशिवाय 'मेक इन इंडिया' अंतर्गत मुंबईतील माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेडमध्ये तीन स्कॉर्पियन (कलवरी) वर्गाच्या पाणबुड्या तयार करण्याचा करारही केला जाऊ शकतो.
ही सर्व 26 राफेल-एम विमानं सिंगल सीटर असतील आणि त्यावर भारतीय नौदलाच्या वैमानिकांना फ्रान्समध्ये तसेच गोव्यातील प्रगत सिम्युलेटरचं प्रशिक्षण दिलं जाईल.
भारतीय नौदल जुन्या मिग 29Ks नंतर INS विक्रांतसाठी नवीन लढाऊ विमान तैनात करण्याचा विचार करत आहे.
या बदलासाठी, अमेरिकेच्या F-18 सुपर हॉर्नेट व्यतिरिक्त, नौदलाला राफेल मरीनकडूनही खूप अपेक्षा आहेत.
राफेल-एम आवश्यकतेनुसार, प्रशिक्षण, दुरुस्ती, देखभाल आणि अपग्रेडवर बचत करण्यात मदत करेल.
या विमानाचं डिझाइन अशा प्रकारे करण्यात आलं आहे की, हे विमान एयरक्राफ्ट कॅरियरहूनही ऑपरेट करणं शक्य आहे.
जर आपण कम्पेटिबिलिटी बद्दल बोलायचं झालं, तर 'राफेल एम'ला चांगलं रेटिंग मिळालं आहे आणि या राफेलनं हवाई दलात राहून अनेक ऑपरेशन्समध्ये मोलाची कामगिरी केली आहे.
'राफेल एम'चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते अणुहल्ला देखील सक्षमपणे करू शकतं.