देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. ABP C Voter Survey: अजित पवारांच्या बंडामागे थोरल्या पवारांचाच हात? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष, लोकांचं मत अजुनही...


ABP News C Voter Survey On NCP Crisis: महाराष्ट्रात एका मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे (NCP)  नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही नेत्यांसह बंडखोरी करत एनडीएमध्ये सामील झाले आहेत. एवढंच नाहीतर अजित पवारांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टिकास्त्र डागली आहेतच, पण राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावरही त्यांनी दावा केला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढायचा ठरवलं असून अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांनाही खडे बोल सुनावले आहेत. बंडखोरांची अधिकृतपणे पक्षातून हाकालपट्टी करत शरद पवारांनी पक्ष मी स्थापन केला असून पक्षाचा अध्यक्ष मीच आहे, असं स्पष्ट केलं आहे.  वाचा सविस्तर 


2. Weather Update : उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला, काही भागात जनजीवन विस्कळीत; वाचा देशभरातील हवामानाचा अंदाज


Weather Update News : देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Hevay Rain) कोसळत आहे. उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीतही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या पावसामुळं यंदाची अमरनाथ यात्रा देखील काल सलग दुसऱ्या दिवशी पाऊस आणि भूस्खलनामुळे पुढे ढकलावी लागली आहे. वाचा सविस्तर 


3. Seema Haider : 'मी पाकिस्तानात गेले तर वाचणार नाही...', प्रियकरासाठी भारतात आलेल्या सीमाची मुख्यमंत्री योगींना विनवणी; म्हणाली...


India-Pakistan Love Story : प्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदरला आता इथेच राहायचे आहे. शनिवारी (8 जुलै 2023) तुरुंगातून सुटल्यानंतर तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना तिचा प्रियकर सचिनबरोबर भारतात राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली. याबरोबरच सीमाने असंही म्हटलं आहे की, जर ती पाकिस्तानात गेली तर तिला तिथे कोणी जिवंत सोडणार नाही. खरंतर, बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी सीमाला 4 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तिचा भारतीय प्रियकर सचिन आणि सचिनच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. वाचा सविस्तर 


4. GST चोरी करणाऱ्यांना दणका! ईडी करणार कारवाई; सरकारनं उचललं मोठे पाऊल


GSTN under PMLA : केंद्र सरकारने जीएसटी (GST) ला प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जीएसटी चोरी करण्याऱ्यावर ईडीला कारवाई करता येईल. वाचा सविस्तर 


5. Agriculture News : रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळं आजारांचं प्रमाण वाढलं, कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी वैज्ञानिकांनी प्रयत्न करावेत : मांडवीय 


Agriculture News : कृषी आणि मृदा उत्पादकता वाढवण्यासाठी वैज्ञानिक उपाय शोधून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही कृषी वैज्ञानिकांची जबाबदारी असल्याचे मत  केंद्रीय रसायने आणि खत मंत्री  डॉ. मनसुख मांडवीय (Dr Mansukh Mandaviya) यांनी व्यक्त केले. शेतामध्ये पोषक तत्वांचा गरजेपेक्षा अधिक आणि बेसुमार वापर केल्यामुळे, जमिनीची सुपिकता आणि उत्पादन क्षमता कमी होते. म्हणूनच कृषी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांनी आणि सरकारनं एकत्रित काम करुन, जमिनीवर रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याची गरज असल्याचे मांडवीय म्हणाले. वाचा सविस्तर 


6. 9th July In History: अभिनेते, दिग्दर्शक गुरुदत्त यांचा जन्म, मुंबई शेअर बाजाराची सुरुवात; आज इतिहासात


9th July In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. त्या-त्या दिवशी घडलेल्या घटना महत्त्वाच्या असतात. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराची वडाच्या झाडाखाली सुरुवात झाली. आजच्या दिवशी प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा असलेली विंबल्डन चॅम्पियनशिप सुरू झाली. तर, आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीवर छाप सोडणारे गुरुदत्त यांचा जन्म झाला. वाचा सविस्तर 


7. Horoscope Today 09 July 2023 : मेष, सिंह, धनु राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


Horoscope Today 09 July 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांनी आज आपल्या कामात व्यस्त राहण्याबरोबरच आपल्या प्रियजनांसाठी थोडा वेळ काढावा. कन्या राशीच्या लोकांनी आज बोलण्यात गोडवा ठेवावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. एकूणच आजचा रविवार मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर