देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


1. Karnataka Elections 2023: कर्नाटकात आज प्रचाराची रणधुमाळी; मोदी-शाहांना राहुल-प्रियांकाची टक्कर, संपूर्ण राज्यात सभा अन् रोड शोचा सपाटा


Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Elections) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटकात राजकीय रविवार पाहायला मिळणार आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi) काँग्रेसच्या (Congress) बाजूनं जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत. एकूणच आज कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे, याच काही शंकाच नाही. वाचा सविस्तर 


2. Praful Patel:  प्रफुल पटेल यांच्याशी संबंधित संस्थेला द्यावे लागणार 65 कोटी; जाणून घ्या काय आहे प्रकरण?


Praful Patel:  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्याशी संबंधित संस्थेला सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. प्रफुल पटेल यांच्याशी संबंधित संस्थेला आपल्या कर्मचाऱ्यांना 65 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. मनोहरभाई पटेल इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पगाराचा मुद्दा या आदेशानंतर निकाली निघाला आहे. वाचा सविस्तर 


3. Go First पाठोपाठ आणखी एक एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर; प्रकरण नेमकं काय?


Airline Crisis: गो फर्स्ट (GO First) पाठोपाठ आणखी एक विमान कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. देशातील आणखी एका विमान कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणी होणार असून ती कंपनी म्हणजे, स्पाईसजेट (Spicejet). नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) पुढील आठवड्यात स्पाईसजेट कंपनीच्या कर्जदात्यानं दाखल केलेल्या दिवाळखोरीच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. स्पाईसजेटविरोधातील दिवाळखोरीच्या याचिकेवर एनसीएलटीमध्ये 8 मे रोजी सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर 


4. Chandrayaan 3: जुलैमध्ये लॉन्च होणार ISRO चं चांद्रयान-3; जाणून घ्या, 'मून मिशन'बद्दल सर्वकाही


Indian Space Research Organization: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) जुलै महिन्यात भारताच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेला (Moon Mission) सुरुवात करण्याची योजना आखत आहे. याबाबत माहिती देताना इस्रोच्या (ISRO) एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, याच महिन्यात इस्रो आपलं पहिलं सूर्य मिशनही सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, आदित्य-L1 हे सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली वैज्ञानिक मोहीम आहे. वाचा सविस्तर 


5. World Laughter Day 2023 : आज 'जागतिक हास्य दिन,' जाणून घ्या या दिनाची सुरुवात आणि हास्याचे फायदे...


World Laughter Day 2023 : जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे हसण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी देश-विदेशात विविध प्रकारच्या विनोदी स्पर्धांचे आयोजन केले जाते. सर्व लोकांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी हसणे खूप फायदेशीर आहे. वाचा सविस्तर 


6. 7th May In History: नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म, दुर्गा भागवत यांचे निधन; आज इतिहासात...


7th May In History: प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. इतिहासात प्रत्येक दिवसातील महत्त्वाच्या घडामोडींची नोंद घेतली जाते. आजच्या दिवशी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला होता. तर, धर्मशास्त्राचे अभ्यासक भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्मही आजच्या दिवशी झाला होता. त्याशिवाय, इतरही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी... वाचा सविस्तर 


7. Horoscope Today 7 May 2023 : आजचा रविवार 'या' राशीसाठी लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य


Horoscope Today 7 May 2023 : आज रविवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. मेष राशीच्या लोकांना आज फार उत्साही वाटेल. तर मिथुन राशीला मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमचा जोडीदार तुम्हाला तुमच्या घरातील कामात मदत करेल. कसा राहील मेष ते मीन राशींसाठी आजचा रविवार? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर