Indian Space Research Organization: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) जुलै महिन्यात भारताच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेला (Moon Mission) सुरुवात करण्याची योजना आखत आहे. याबाबत माहिती देताना इस्रोच्या (ISRO) एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, याच महिन्यात इस्रो आपलं पहिलं सूर्य मिशनही सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, आदित्य-L1 हे सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली वैज्ञानिक मोहीम आहे. 


इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "अंतराळ संस्था चांद्रयान-3 (Chandrayaan-3) जुलैमध्ये लॉन्च करण्याचं लक्ष्य समोर ठेवून काम करत आहे. त्यानंतर आदित्य-एल1 देखील लॉन्च होईल. आम्ही सध्या सर्व चाचण्या पूर्ण करत आहोत आणि आम्हाला आशा आहे की, आम्ही ठरल्याप्रमाणे सर्व चाचण्या पार करुन यशस्वी उड्डाण करण्यासाठी सज्ज होऊ." 


चांद्रयान-2 दरम्यान... 


2019 मध्ये, चांद्रयान-2नं (Chandrayaan-2) यशस्वीरित्या पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेनं उड्डाण केलं होतं. ते चंद्राच्या कक्षेतही पोहोचलं होतं. पण, त्याच्या लँडर सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि 6 सप्टेंबर 2019 मध्ये चंद्रावर उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच ते चंद्रावरच क्रॅश झालं. चांद्रयान-3 मध्ये स्वदेशी लँडर मॉड्यूल, एक रोव्हर समाविष्ट आहे. लँडरमध्ये मऊ लँड करण्याची आणि रोव्हर तैनात करण्याची क्षमता असेल, अशी माहिती इस्रोच्या वतीनं देण्यात आली आहे. दरम्यान, चांद्रयान-3 मोहिमेसाठी 9 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.


भारताचं पहिलं वैज्ञानिक मिशन


आदित्य-एल1 ही सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली वैज्ञानिक मोहीम आहे. याआधी, मिशनची कल्पना आदित्य-1 मध्ये पेलोड, VELC, 400 kg वर्गाचा उपग्रह आहे आणि 800 किमी खाली पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची योजना होती.


आदित्य-एल 1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली मोहीम


आदित्य-एल1 ही सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली वैज्ञानिक मोहीम आहे. यापूर्वी या मोहिमेचे नाव आदित्य-1 असं होतं. या मिशनमध्ये 400 KG वर्गाचा उपग्रह, VELC पेलोडसह होता आणि 800 किमी कमी पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची योजना होती.
 
आदित्य-1 मिशनचं नाव बदलून आदित्य-L1 करण्यात आलं आहे. हे मिशन पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या L1 बिंदूभोवती कक्षेत ठेवलं जाईल.