Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Elections) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटकात राजकीय रविवार पाहायला मिळणार आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi) काँग्रेसच्या (Congress) बाजूनं जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत. एकूणच आज कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे, याच काही शंकाच नाही.  


कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) बंगळुरूमध्ये 36 किलोमीटर लांबीचा रोड शो करणार आहेत. पीएम मोदींचा हा मेगा रोड शो दोन भागांत विभागला गेला आहे. यापैकी एक म्हणजे 26 किमी लांबीचा रोड शो आदल्या दिवशी (6 मे) करण्यात आला आहे. तसेच, आज (7 मे) दुसरा 10 किमी लांबीचा रोड शो होणार आहे. रोड शोनंतर पंतप्रधान शिवमोग्गा (Shivamogga) आणि म्हैसूर (Mysuru) येथे दोन जाहीर सभा घेणार आहेत.


कर्नाटकात आज प्रचाराची रणधुमाळी 


भाजपच्या वतीनं पंतप्रधान कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bengaluru) असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेलगावी (Belagavi) आणि इतर भागात असतील. शाह येथे एकूण 4 रोड शो आणि जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. काँग्रेसही प्रचारात मागे नाही. काँग्रेसच्या वतीनं, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज बंगळुरूमध्ये असतील, जिथे ते दोन ठिकामी कॉर्नर सभा घेणार आहेत आणि प्रियंका गांधींसोबत रोड शो देखील करणार आहेत. याशिवाय प्रियांका दोन रोड शो आणि दोन जाहीर सभा घेणार आहेत.


सोनिया गांधीही निवडणुकीच्या प्रचारात


सोनिया गांधीही (Sonia Gandhi) काँग्रेसच्या प्रचारासाठी कर्नाटकात उपस्थित होत्या. काल (6 मे) सोनिया गांधींनी हुबळी येथे निवडणूक रॅलीला संबोधित केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत  काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) देखील उपस्थित होते. याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधींच्या काल (6 मे) कर्नाटकात जाहीर सभा पार पडल्या. 


गेल्या चार वर्षांत सोनिया गांधी पहिल्यांदाच प्रचारासाठी उपस्थित राहिल्यात. सोनिया गांधी यांनी हुबळी-धारवाड सेंट्रलमधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांच्या बाजूनं जाहीर सभेला संबोधित केलं. भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये आले आहेत. तर, भाजपकडून हुबळी-धारवाड मतदारसंघातून महेश टेंगीनकाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Karnataka Election Survey: बेरोजगारी, गरीबी, टीपू सुल्तान.... कर्नाटक निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा कोणता? सर्वेक्षणातून खुलासा