देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. Karnataka Election 2023: बेळगावमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची सभा उधळली, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक
Karnataka Election 2023: सध्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांची (Karnataka Election 2023) रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु करत प्रचार सुरु केला आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) काही नेते देखील प्रचारासाठी बेळगावमध्ये जात आहेत. देसुर येथे काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या प्रचारासाठी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांची सभा आयोजीत केली होती. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांची उधळली. वाचा सविस्तर
2. CBI Raids: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर सीबीआयकडून छापेमारी; प्रकरण नेमकं काय?
CBI Raids: 538 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणी CBI नं शुक्रवारी (5 मे) जेट एअरवेजचे (Jet Airways) संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) यांच्यावर मोठी कारवाई केली. गोयल यांच्या कार्यालयासह सात ठिकाणी सीबीआयनं (CBI) छापे टाकले. याशिवाय विमान कंपनीचे माजी संचालक गौरांग आनंद शेट्टी यांच्या निवासस्थानाची आणि कार्यालयांचीही सीबीआयकडून झडती घेण्यात आली. वाचा सविस्तर
3. Delhi Rain : मान्सूनपूर्व काळात दिल्लीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस, कमाल तापमानातही वाढ
Delhi Rain News : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका तर कुठे अवकाळी पावसाची (Unseasonal rains) हजेरी लागत आहे. दिल्लीत गेल्या 15 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनपूर्वीच दिल्लीत 200 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, 7 मे पर्यंत दिल्लीत आकाश ढगाळ राहणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वाचा सविस्तर
4. Narendra Singh Tomar : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्राण, GDP मध्ये 19 टक्के वाटा : कृषीमंत्री
Narendra Singh Tomar : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्राण आहे तसेच तो देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा गाभा असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी व्यक्त केले. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये (जीडीपी) या क्षेत्राचा जवळजवळ 19 टक्के वाटा आहे. सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्या या क्षेत्रावर अवलंबून असल्याचे तोमर म्हणाले. देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर भर देणाऱ्या खरीप मोहीम 2023-24 चे दिल्लीत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. वाचा सविस्तर
5. Ethanol Production : हरियाणा सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यात उभारणार इथेनॉल प्लांट
Ethanol Production : साखर उत्पादनाच्या (Sugar Production) बाबतीत भारत हा जगातील एक मोठा उत्पादक देश आहे. देशात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते. साखरेचं अतिरीक्त उत्पादन झाल्यामुळं कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीवर (Ethanol Production) भर द्यावा असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. इथेनॉलबाबत हरियाणा (Haryana) सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये आता इथेनॉल प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यामुळं इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढणार आहे. वाचा सविस्तर
6. Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरज चोप्रानं 5 मे (शुक्रवार) रोजी दोहा डायमंड लीगचं विजेतेपद पटकावलं आहे. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटरवर भाला फेकला. नीरजचा हा पहिला फेक स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो ठरला. दरम्यान, या स्पर्धेतही नीरज त्याच्या नव्या विक्रमापासून दूर राहिल्याचं पाहायला मिळालं. नीरज पुन्हा एकदा 900 मीटरचा अडथळा पार करण्यात अयशस्वी ठरला. वाचा सविस्तर
7. 6th May In History: सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांचे निधन, मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबला फाशी; आज इतिहासात
6th May In History: आजचा दिवस हा देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांचे आजच्याच दिवशी निधन झालं होतं. तर 26 नोव्हेंबर 2011 सालच्या मुंबई हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबलाही आजच्याच दिवशीस फाशी देण्यात आली होती. जाणून घेऊया आजच्या दिवशीच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी. वाचा सविस्तर
8. Horoscope Today 6 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today 6 May 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. कन्या राशीचे लोक जे घरापासून दूर नोकरी करत आहेत त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. कसा असेल शनिवारचा दिवस मेष ते मीन, काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर