देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Demonetisation : मोदी सरकारच्या नोटबंदीला 7 वर्षे पूर्ण! आजही आठवतं ATM आणि बँकांबाहेरील रांगाचं चित्र; याचा काय फायदा झाला?
Demonetisation Anniversary : 8 नोव्हेंबर हा दिवस सर्व भारतीयांच्या आठवणीत कायम राहणार आहे. मोदी सरकारने याच दिवशी नोटबंदी (Demonetisation) ची घोषणा केली होती. 8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वांना मोठा धक्का बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता जनतेला संबोधित केलं आणि ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. रातोरात नोटबंदीची घोषणा झाली. 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्यात आल्या. यानंतरं एटीएम आणि बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाचा सविस्तर
Weather Update : ऊन पावसाचा खेळ! राज्यात पुढील 48 तास पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती
Weather Update Today : राज्यासह देशात गुलाबी थंडी (Cold Weather) चाहूल लागली आहे. मात्र, काही भागात अवकाळी पावसाची (Rain Alert) हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात (Maharashtra Weather) अनेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ पाहायला दिसत आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशातील काही भागात पुढील 48 तास पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर
TATA Group Ceiling Home Appliance Business: टाटा समूह 70 वर्ष जुनी VOLTAS कंपनी विकणार? चर्चांवर कंपनी म्हणते...
TATA Group Looking at Selling Off Voltas Home Appliance: प्रत्येक भारतीयांच्या घरात आणि मनात वसलेला विश्वासार्ह्य ब्रँड म्हणजे, टाटा. टाटा (TATA) असा उल्लेख कोणी केली तरीही सर्वांच्या नजरा विश्वासानं वळतात. कोणतीही वस्तू खरेदी करताना टाटाच्या प्रोडक्ट्सना पहिलं प्राधान्य असतं. अशातच आता टाटा समुहाच्या (TATA Group) एका कंपनीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. टाटा समुहाचा व्होल्टास ब्रँड (Voltas Home Appliance) हा होम अप्लायन्स क्षेत्रातील सर्वात मोठा आणि विश्वासार्ह्य ब्रँड. विशेषत: एअर कंडिशनर आणि वॉटर कूलर मार्केटमध्ये व्होल्टासचं वर्चस्व आहे. पण आता हीच व्होल्टास कंपनी टाटा समूह विकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. वाचा सविस्तर
Glenn Maxwell Double Century Records: तो वेदनेनं व्हिवळत होता, तरिही खेळत होता! ग्लेन मॅक्सव्हेलची स्फोटक खेळी; एका झटक्यात रचले 11 रेकॉर्ड्स
Glenn Maxwell Double Century Records: शानदार, जबरदस्त, जिंदाबाद... ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan) खेळीचं कौतुक करावं तितकं कमीच. स्फोटक, अविस्मरणीय, डोळ्यांचं पारणं फेडणारी खेळी खेळली मॅक्सवेलनं. 128 चेंडूंत नाबाद 201 धावा, त्यातही 21 चौकार आणि 10 षटकार ठोकलेत. खरंतर मंगळवारी वानखेडेवर खेळवण्यात आलेल्या सामना ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध अफगाणिस्तानचा नव्हताच, हा सामना दुखापतग्रस्त ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध अफगाणिस्तान यांचा होता. वाचा सविस्तर
Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धाचा आगडोंब! IDF कडून गाझा पट्टीवर हल्ले कायम, 15 रुग्णालये नेस्तानाभूत
Israel Gaza War : इस्रायल (Israel) चे गाझा पट्टी (Gaza Strip) तील हल्ले सुरुच आहेत. इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यातील युद्धाला महिना उलटून गेला आहे. हमास गाझा पट्टीत रुग्णालयांच्या खालून भूमिगतरित्या दहशतवादी कारवाया करत असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. त्यामुळे इस्रायली लष्कराने गाझातील रुग्णालयावर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. इस्रायली सैन्याने गाझातील 15 रुग्णालयांवर हल्ला करत ते नेस्तानाभूत केल्याचा दावा केला आहे. वाचा सविस्तर
दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचाच वरचष्मा, आगामी निवडणुकांसाठी भाजपचा मेगा प्लॅन; तळागाळात कमळ रूजवण्याची रणनीती कोणती?
ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election Result) नंबर वन पक्ष ठरलेल्या भाजपने (BJP) आता आगामी निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) कंबर कसलीय. भाजपने यासाठी मेगा प्लॅन तयार केला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा आता नमो 11 सूत्री कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नमो 11 सूत्री (Namo 11) कार्यक्रम राबवणार आहे. मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत योजनेचा प्रारंभ होणार आहे. वाचा सविस्तर
Cheapest Smartphone : सर्वात स्वस्त स्मार्टफोन! 8GB RAM किंमत फक्त 7 हजार रुपये, भन्नाट फिचर्स जाणून घ्या
Cheapest Smartphone Under 7000 : तुम्हाला स्मार्टफोन (Smartphone) घ्यायला आहे, पण बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आमही तुम्हाला सर्वात स्वस्त आणि उत्तम स्मार्टफोनबाबत सांगणार आहोत. या स्वस्त स्मार्टफोनमध्ये तुम्हाला भव्वाट फिचर्सदेखील मिळतात. भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आयटेल ए 60 एस ( Itel A60s ) स्मार्टफोन ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये मोठ्या ऑफरसह उपलब्ध आहे. Itel A60s स्मार्टफोन 8 रॅम सह येतो. यामध्ये 4 GB व्हर्च्युअल रॅम आहे. Itel A60s फोनची किंमत 8,999 रुपये आहे, पण तुम्ही अॅमेझॉन ( Amazon ) आणि फ्लिपकार्ट ( Flipkart ) वर 6,500 रुपयांमध्ये हा दमदार फोन खरेदी करू शकता. या फोनमधील अप्रतिम फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटीसह इतर फिचर्स जाणून घ्या... वाचा सविस्तर
8 November In History : लालकृष्ण अडवाणींचा जन्म, वनडे सामन्यात सचिन-द्रवीडची 331 धावांची भागिदारी, मोदी सरकारची नोदबंदी; आज इतिहासात
8 November In History : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस अविस्मरणीय असाच आहे. आजच्याच दिवशी 1999 साली, न्यूझीलंडच्या विरोधात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रवीडने 331 धावांची भागीदारी (Sachin Tendulkar And rahul dravid Partnership) केली होती. तो सामना भारताने खिशात घातला. तर आजच्याच दिवशी 2016 साली केंद्रातल्या मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय (Narendra Modi Demonitisation Decision) घेतला आणि 500, 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. वाचा सविस्तर
Horoscope Today 8 November 2023 : आजचा बुधवार खास! 'या' राशींना होणार आर्थिक लाभ; मेष ते मीन राशीचं आजचं राशीभविष्य, जाणून घ्या
Horoscope Today 8 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 8 नोव्हेंबर 2023 बुधवार हा महत्त्वाचा दिवस (Horoscope Today) आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांना आज ऑफिसमध्ये थकवा जाणवेल. तूळ राशीच्या व्यावसायिकांवर कर्ज किंवा उधारी असू शकते, त्याची परतफेड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर