Glenn Maxwell Double Century Records: शानदार, जबरदस्त, जिंदाबाद... ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan) खेळीचं कौतुक करावं तितकं कमीच. स्फोटक, अविस्मरणीय, डोळ्यांचं पारणं फेडणारी खेळी खेळली मॅक्सवेलनं. 128 चेंडूंत नाबाद 201 धावा, त्यातही 21 चौकार आणि 10 षटकार ठोकलेत. खरंतर मंगळवारी वानखेडेवर खेळवण्यात आलेल्या सामना ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध अफगाणिस्तानचा नव्हताच, हा सामना दुखापतग्रस्त ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध अफगाणिस्तान यांचा होता.


मॅक्सवेल मैदानात उतरला, त्यानं पाहिलं आणि त्यानं मनाशी पक्कं केलं. त्याच्या रस्त्यात अडथळे आले आणि अफगाणिस्तानकडूनही त्याला एकदा नाही, दोनदा नाही तर तिनदा जीवनदान मिळालं. अफगाणिस्तानची हीच चूक त्यांना महागात पडली आणि विश्वचषक 2023 च्या आतापर्यंतच्या सामन्यांत सर्वांनी न भूतो न भविष्यती असा सामना पाहिला. संघ कोणताही असो, प्रेक्षक कोणतेही असोत, ग्लेन मॅक्सवेलनं सर्वांनाच त्याच्या धमाकेदार, स्फोटक खेळीची दखल घेण्यास भाग पाडलं. 


अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलनं सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही केला आहे. याशिवाय त्यानं इतरही अनेक मोठे विक्रमही रचले आहेत. 


तो वेदनेनं व्हिवळत होता, तरिही तो खेळत होता 


मुंबईतील वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून सर्वात आधी फलंदाजी करत 292 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं. कांगारू संघानं 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. यासोबतच दोन मोठे विक्रमही रचलेत. वानखेडेवरील एकदिवसीय सामन्यातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठं लक्ष्य आहे. तसेच, ऑस्ट्रेलियानं विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाठलाग केला आहे. 


तुफानी खेळीदरम्यान मॅक्सवेलनं पाठदुखीची तक्रारही केली होती. तसेच, हॅमस्ट्रिंगला गंभीर दुखापत झाली. पण मॅक्सवेलनं संपूर्ण सामना लंगडत खेळला. त्याला प्रचंड वेदाना होत होत्या, हे त्याच्या प्रत्येक धावेसोबत दिसत होतं. पण, तो लढला, तो मैदानाबाहेर गेला नाही. जबरदस्त उत्साह दाखवत त्यानं ऑसी  संघाला जोरदार विजय मिळवून दिला आणि सेमीफायनलचं आव्हान पार केलं. 






मॅक्सवेलनं विश्वचषकात कपिल देवचा विक्रम मोडला


आपल्या खेळीच्या जोरावर मॅक्सवेलनं 1983 चा विश्वचषक जिंकणारा माजी भारतीय कर्णधार कपिल देवचाही विक्रम मोडीत काढला आहे. दरम्यान, एक वेळ अशी होती की, 292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारू संघानं एकेकाळी 91 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. सामना हातातून गेल्यातच जमा होता. यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेलनं संपूर्ण परिस्थिती बदलून टाकली.


खरं तर मॅक्सवेलच्या तुफानी खेळीचं श्रेय अफगाणिस्तानला दिलं तरी वावगं ठरणार नाही. कारण अफगाणिस्ताननं मॅक्सवेललाही तब्बल तिनदा जीवनदान दिलं. तिनदा मॅक्सेवेलचा विकेट अफगाणिस्ताननं सोडला अन् हीच चूक त्यांना महागात पडली. याचाच फायदा घेत सेट झालेल्या मॅक्सवेलनं बॅट उचलली आणि फिरवायला सुरुवात केली. त्यानं तुफानी खेळी खेळत अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. मॅक्सवेलनं कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीनं आठव्या विकेटसाठी 170 चेंडूत 202 धावांची नाबाद भागीदारी केली.


मॅक्सवेलच्या द्विशतकी खेळीमुळे मॅक्सवेलनं विश्वचषकात कपिल देवचा विक्रम मोडीत काढला आहे. वर्ल्डकपमध्ये मॅक्सवेलच्या आधी फक्त कपिल देवनं सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक नाबाद 175 धावांची खेळी केली होती. 1983 च्या विश्वचषकात त्यानं झिम्बाब्वेविरुद्ध ही खेळी खेळली होती. कालच्या सामन्यातही त्यानं आपल्या नावे अनेक विक्रम केलेत... 


विश्वचषकाच्या एका डावात सर्वात कमी स्ट्राईक रेटचा विक्रम (10 पेक्षा जास्त धावा)


16.43 : जॅक हेरोन (जिम्बाब्वे) vs वेस्टइंडीज, 1983 
17.64 : पॅट कमिंस (ऑस्ट्रेलिया) vs अफगाणिस्तान, 2023 
18.18 : महमूद कुरैशी (ईस्ट आफ्रीका) vs न्यूजीलंड, बर्मिंघम, 1975 
20 : क्रिस्टोफर चॅपल (कनाडा) vs पाकिस्तान, लीड्स, 1979 


विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक षटकार


17 : ओएन मोर्गन (इंग्लंड) vs अफगानिस्तान, मॅनचेस्टर, 2019 
16 : क्रिस गेल (वेस्टइंडीज) vs झिम्बाब्वे, कॅनबरा, 2015 
11 : मार्टिन गुप्टिल (न्यूजीलंड) vs वेस्टइंडीज, वेलिंग्टन, 2015 
11 : फखर जमां (पाकिस्तान) vs न्यूजीलंड, बंगळुरू, 2023 
10 : ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) vs अफगाणिस्तान, मुंबई, 2023 


एकदिवसीय (चेंडूंमध्ये) सर्वात जलद द्विशतक करणारा मॅक्सवेल हा दुसरा खेळाडू ठरला.


126 बॉल : ईशान किशन (टीम इंडिया) vs बांगलादेश, चटगांव, 2022 
128 बॉल : ग्लेन मैक्सवेल (ऑस्ट्रेलिया) vs अफगाणिस्तान, मुंबई, 2023 
138 बॉल : क्रिस गेल (वेस्टइंडीज) vs झिम्बाब्वे, कॅनबरा, 2015


एकदिवसीय सामन्यात सलामीवीर नसलेल्या व्यक्तीनं केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या


201* : ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) vs अफगाणिस्तान, मुंबई, 2023 
194* : चार्ल्स कॉवेंट्री (झिम्बाब्वे) vs बांगलादेश, बुलावायो, 2009 
189* : विवियन रिचर्ड्स (वेस्टइंडीज) vs इंग्लंड, मॅनचेस्टर, 1984 
185 : फाफ डु प्लेसिस (दक्षिण आफ्रीका) vs श्रीलंका, केपटाऊन, 2017 


याआधी वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजच्या व्हिव्हियन रिचर्ड्सनं 181 धावांची सर्वोत्तम धावसंख्या केली होती. 1987 च्या कराची सामन्यात त्यानं श्रीलंकेविरुद्ध ही खेळी खेळली होती.


सातव्या किंवा त्यापेक्षा कमी विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला 


202* : ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिंस (ऑस्ट्रेलिया) vs आफगाणिस्तान, मुंबई, 2023 WC 
177 : जोस बटलर आणि आदिल राशिद (इंग्लंड) vs न्यूजीलंड, बर्मिंघम, 2015 
174* : अफीफ हुसैन आणि मेहदी हसन मिराज (बांगलादेश), चटगांव, 2022 
162 : मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सेंटनर (न्यूजीलंड) vs भारत, हैदराबाद, 2023


मॅक्सवेलनं एकदिवसीय विश्वचषकातील तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली


237* : मार्टिन गुप्टिल (न्यूजीलंड) vs वेस्टइंडीज, वेलिंग्टन, 2015 
215 : क्रिस गेल (वेस्टइंडीज) vs झिम्बाब्वे, कैनबरा, 2015 
201* : ग्लेन मैक्सवेल (ऑस्ट्रेलिया) vs अफगाणिस्तान, मुंबई, 2023 
188* : गैरी कर्स्टन (दक्षिण आफ्रीका) vs UAE, रावलपिंडी, 1996 
183 : सौरव गांगुली (टीम इंडिया) vs श्रीलंका, टॉन्टन, 1999 


मॅक्सवेलनं वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या केली


201* : ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) vs अफगाणिस्तान, मुंबई, 2023 वर्ल्डकप 
193 : फखर जमां (पाकिस्तान) vs दक्षिण आफ्रीका, जोहानिसबर्ग, 2021 
185* : शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया) vs बांगलादेश, मीरपूर, 2011 
183* : महेंद्र सिंह धोनी (टीम इंडिया) vs श्रीलंका, जयपूर, 2005 
183 : विराट कोहली (टीम इंडिया) vs पाकिस्तान, मीरपूर, 2012


याआधी विश्वचषकात, इंग्लंडच्या अँड्र्यू स्ट्रॉसनं भारताविरुद्ध धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या केली होती. 2011 च्या विश्वचषकात हा सामना बंगळुरू येथे खेळला गेला होता.


वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम


49 : क्रिस गेल 
45 : रोहित शर्मा 
43 : ग्लेन मैक्सवेल 
37 : एबी डिविलियर्स 
37 : डेविड वॉर्नर 


ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं केली सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या 


201* : ग्लेन मॅक्सवेल vs अफगाणिस्तान, मुंबई, 2023 वर्ल्डकप 
185* : शेन वॉटसन vs बांगलादेश, मीरपूर, 2011 
181* : मॅथ्यू हेडन vs न्यूजीलंड, हेमिल्टन, 2007 
179 : डेविड वॉर्नर vs पाकिस्तान, एडिलेड, 2017 
178 : डेविड वॉर्नर vs अफगाणिस्तान, पर्थ, 2015 वर्ल्डकप