मंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election Result) नंबर वन पक्ष ठरलेल्या भाजपने (BJP) आता आगामी निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) कंबर कसलीय. भाजपने यासाठी मेगा प्लॅन तयार केला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा आता नमो 11 सूत्री कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नमो 11 सूत्री (Namo 11) कार्यक्रम राबवणार आहे. मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत योजनेचा प्रारंभ होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला. आता कायमच इलेक्शन मोडवर असलेल्या भाजपने ग्रामपंचायत निकालांच्या जल्लोषानंतर तातडीने आगामी निवडणुकांची रंगीत तालीम सुरू केलीय. आगामी लोकसभा, विधानसभांसाठी भाजपच्या नेत्यांनी विशेष तयारी सुरू केलीय. भाजपचे नेते लवकरच राज्यभर दौरे करणार असल्याची माहिती मिळतेय. अखेरच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचं भाजपचं टार्गेट आहे. त्यासाठी नियोजनबद्ध आखणी सुरू आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातून पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपक्रमाची सुरुवात करणार आहे. कामगार वर्गाची मते
मिळवण्यासाठी भाजपची नवी खेळी खेळली आहे.
काय आहे भाजपचा प्लॅन?
- राज्यात भाजप वॉररूमचं जाळं विणलं जाणार आहे.
- 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदारसंघात पोहोचण्यासाठी एक खास टीम नेमली जाईल.
- प्रत्येक मतदारसंघातील समस्या, विषयांची माहिती भाजप जमा करणार आहे.
- नमो 11 सूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात आदिवासी, महिला बचतगट, खेळाडू, मच्छिमार या घटकांपर्यंत पोहोचण्याचं भाजपचं लक्ष्य आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना सामोरं जाण्यास भाजप घाबरत आहे अशी टीका वारंवार केली जाते. मात्र हा नरेटीव्ह ग्रामपंचायत निकालातून पुसून टाकण्यात भाजपला यश आल्याचं बोललं जातंय. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातही आत्मविश्वास भरण्याचं काम या निकालांनी करून दाखवलंय. त्यामुळे आता ग्रामपंचायत निकालांनंतर भाजपने आगामी निवडणुकांसाठी गिअर बदलण्याचं रणनीती आखल्याचं स्पष्ट दिसतंय.
2019 च्या लोकसभेचं गणित काय होतं? (Lok Sabha Election Result 2019)
महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2019 ला 48 पैकी 23 जागा भाजपनं जिंकल्या तर 18 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला. चार जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आगामी निवडणुकीत भाजपनं 45 जागांवर जिंकण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे.
हे ही वाचा :
BJP Mission 45 : मिशन 45 साठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू, जिल्हाध्यक्षांची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक