Cheapest Smartphone Under 7000 : तुम्हाला स्मार्टफोन (Smartphone) घ्यायला आहे, पण बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आमही तुम्हाला सर्वात स्वस्त आणि उत्तम स्मार्टफोनबाबत सांगणार आहोत. या स्वस्त स्मार्टफोनमध्ये तुम्हाला भव्वाट फिचर्सदेखील मिळतात. भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आयटेल ए 60 एस ( Itel A60s ) स्मार्टफोन ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये मोठ्या ऑफरसह उपलब्ध आहे. Itel A60s स्मार्टफोन 8 रॅम सह येतो. यामध्ये 4 GB व्हर्च्युअल रॅम आहे. Itel A60s फोनची किंमत 8,999 रुपये आहे, पण तुम्ही अॅमेझॉन ( Amazon ) आणि फ्लिपकार्ट ( Flipkart ) वर 6,500 रुपयांमध्ये हा दमदार फोन खरेदी करू शकता. या फोनमधील अप्रतिम फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटीसह इतर फिचर्स जाणून घ्या
ऑक्टा-कोर प्रोसेसर
नवीन Itel A60s हा अतिशय परवडणारा स्मार्टफोन आहे. Itel A60s फोनमध्ये 6.6 इंच HD Plus IPS LCD डिस्प्ले आहे. फोन 10W मानक चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरीसह येतो. हा फोन 8GB पर्यंत रॅमला सपोर्ट करतो आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्वस्त असूनही, नवीन Itel A60s स्मार्टफोन बायोमेट्रिक अनलॉकिंगसाठी फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक सारख्या फिचर्ससह येतो. Itel A60s स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 8 मेगापिक्सलचा AI प्रायमरी सेन्सर आहे.
128GB स्टोरेजसह सर्वात स्वस्त फोन
Itel A60s ची भारतातील सुरुवातीच्या मॉडेलची किंमत 6,299 रुपये आहे, हा फोन 8GB (4GB + 4GB) रॅम आणि 64GB स्टोरेज सह उपलब्ध आहे. Amazon आणि Flipkart वरून तुम्हाला हा स्मार्टफोम खरेदी करता येईल. कंपनीने 8GB (4GB+4GB) रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट देखील लाँच केले आहेत. त्याची किंमत 6,999 रुपये आहे. Itel A60s स्मार्टफोन मूनलाईट वायलेट, शॅडो ब्लॅक आणि ग्लेशियर ग्रीन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
8 GB पर्यंत RAM सर्पोट
आयटेल इंडिया (itel India) च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन Itel A60s स्मार्टफोनला वॉटरड्रॉप स्टाइल नॉचसह 6.6 इंच HD Plus (720x1612 pixels) IPS LCD डिस्प्ले आहे. डिस्प्ले 60 Hz रिफ्रेश रेट आणि 120 Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोन Android 12 सह प्रीइंस्टॉल केलेला आहे. फोन क्वाड-कोर युनिसॉक SC9863A1 प्रोसेसरसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह जोडलेला आहे. या फोनमध्ये 4GB व्हर्चुअल रॅम सपोर्टही आहे, म्हणजेच या फोनमध्ये तुम्हाला एकूण 8GB रॅम मिळेल.
सेफ्टी फिचर्ससह परवडणारा फोन
फोटोग्राफीसाठी, itel A60s मध्ये मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ड्युअल 8-मेगापिक्सेल AI कॅमेरा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फ्रंट 5 मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे. बायोमेट्रिक अनलॉकिंगसाठी फोनमध्ये मागील माउंट केलेल्या फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सपोर्ट आहे.
स्वस्त स्मार्टफोनमध्ये उत्तम फिचर्स
5000 mAh बॅटरी 32 दिवसांपर्यंत चालते नवीन Itel A60s मध्ये उपलब्ध असलेल्या कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, वाय-फाय, ब्लूटूथ, 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि जीपीएस यांचा समावेश आहे. फोनमध्ये ग्रॅव्हिटी सेन्सर आणि कंपासही आहे. हा फोन 5000 mAh बॅटरीसह येतो. यामध्ये 10W मानक चार्जिंग सपोर्ट आहे. या स्मार्टफोनचा स्टँडबाय टाइम 32 दिवसांपर्यंत आणि टॉक टाइम 7.5 तासांपर्यंत आहे, असा दावा कंपनीने केला आहे.