देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


धर्माच्या नावानं मतं मागायची? प्रश्न विचारणाऱ्या पत्राला निवडणूक आयोगाचं उत्तर नाहीच, ठाकरेंकडून पुन्हा स्मरणपत्र


Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (ShivSena - Uddhav Balasaheb Thackeray) पक्षानं स्मरणपत्राद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. वाचा सविस्तर 


विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजणार; नवाब मलिकांवरुन खडाजंगी, तर शेतीच्या नुकसानाचा मुद्दा वादळी ठरणार


Maharashtra Assembly Winter Session 2023, Day 2: नागपुरात (Nagpur News) हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. नवाब मलिकांवर आरोप करणाऱ्या भाजपला (BJP) आता मलिक कसे चालतात? असा सवाल करत सभागृहात ठिणगी पडली. वाचा सविस्तर 


Vladimir Putin On PM Modi: पुतिन यांनाही पडलीये मोदींची भूरळ; उधळलीयेत स्तुतिसुमनं, नेमकं काय म्हणाले पुतिन?


Vladimir Putin On PM Narendra Modi: रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी गुरुवारी (7 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं कौतुक केलं आणि म्हटलं की, त्यांना घाबरवलं जाऊ शकत नाही किंवा राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध निर्णय घेण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही. पुतिन यांनी पंतप्रधान मोदींच्या कठोर भूमिकेचं कौतुक केलं. वाचा सविस्तर 


Pakistan Tour of Australia: पाकिस्तानच्या सामन्यात LIVE टिव्हीवर अचानक दिसलं असं काही, की गोंधळच झाला!


Pakistan Team: भारतात झालेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) मध्ये पाकिस्तानी संघाची (Pakistan Team) कामगिरी काही खास नव्हती. पाकिस्ताननं केवळ चारच सामने जिंकले. वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. बाबर आझमनं तिन्ही फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं आणि त्यानंतर शान मसूदकडे कसोटी संघाची तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडे टी-20 संघाची धुरा सोपवण्यात आली. वाचा सविस्तर 


8th December In History : नानासाहेब पेशवा, बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांचा जन्म; आज इतिहासात...


8th December In History :  इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्व असते. इतिहासात घडलेल्या घडामोडींचा भविष्यावरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. आजच्या दिवशी नानासाहेब पेशना यांचा जन्म झाला. त्याशिवाय, बॉलिवूडचे अभिनेते हिमॅन धर्मेंद्र, अभिनेत्री शर्मिला टागोर यांचाही वाढदिवस आहे. वाचा सविस्तर 


Horoscope Today 8 December 2023 : आजचा शुक्रवार खास! मेष ते मीन राशीसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य


Horoscope Today 8 December 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 8 डिसेंबर 2023 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांना आज नोकरीत बढती मिळू शकते, अधिकारी तुमच्या कामावर खूश असेल. आज कन्या राशीच्या लोकांना पोटाशी संबंधित किंवा रक्ताशी संबंधित कोणतीही समस्या त्रास देऊ शकते. घरचे बनवलेले अन्न खा, सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे उद्याचे राशीभविष्य जाणून घेऊया... वाचा सविस्तर