देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Delhi Politics: तीन समन्स, तरीही केजरीवाल ईडी चौकशीसाठी गैरहजर; आज अटक होणार? 'आप' नेत्यांच्या दाव्यानं खळबळ
Delhi Politics: नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी (Delhi Liquor Scam Case) अंमलबजावणी संचालनालयानं (Enforcement Directorate) बजावलेल्या तिसऱ्या समन्सनंतरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) हजर झाले नाहीत. त्यांनी त्यांचं लेखी उत्तर ईडीला (ED) पाठवलंय. तसेच, तपास यंत्रणेची नोटीस बेकायदेशीर असल्याचं आम आदमी पक्षाचं (Aam Aadmi Party) म्हणणं आहे... वाचा सविस्तर
महाविकास आघाडीचा फॉर्मुला तयार, आम्ही राज्यात 41 जागा जिंकू, नाना पटोलेंचा दावा
पुणे : महाविकास आघाडीमध्ये (MVA ) कोणताही वाद नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha Election 2024) आमचा फॉर्मुलाही तयार झालाय. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करु, असे सांगतानाच काँग्रेस नेते नाना पटोले (nana patole) यांनी राज्यात महाविकास आघाडी 40 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केलाय. ते पुण्यात (pune News) बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली... वाचा सविस्तर
इराणमध्ये 20 मिनिटांच्या अंतरानं दोन मोठे बॉम्बस्फोट; 95 जणांचा मृत्यू, सडेतोड उत्तर मिळेल, सर्वोच्च नेते खोमेनींचा इशारा
Iran Bomb Blast : इराणचे (Iran) माजी लष्कर कमांडर कासिम सुलेमानी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी (3 डिसेंबर 2024) इराणमध्ये मोठी गर्दी जमली होती. याचवेळी तिथे दोन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात तब्बल 95 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटांमध्ये 200 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणत्याही देशानं किंवा संघटनेनं या स्फोटांची जबाबदारी घेतलेली नाही... वाचा सविस्तर
Javed Akhtar : जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान; म्हणाले,"भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील"
Javed Akhtar in Ajanta Ellora International Film Festival : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन (Ajanta Ellora International Film Festival) सोहळा नुकताच पार पडला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनादरम्यान पद्मभूषण जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील, असं जावेद अख्तर म्हणाले... वाचा सविस्तर
Aamir Khan : लेकीच्या लग्नात 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान लाइमलाईटमध्ये, भर मंडपात पहिल्या बायकोसमोर दुसऱ्या बायकोला केलं किस; नेटकऱ्यांनी घेतली शाळा
Aamir Khan Kissed Ex Wife Kiran Rao : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नबंधनात अडकली आहे. पण भर मंडपात पहिली बायको रीना दत्तासमोर (Reena Dutta) दुसऱ्या बायकोला अर्थात किरण रावला (Kiran Rao) किस केल्याने आमिर सध्या चर्चेत आहे... वाचा सविस्तर
IND vs SA : केपटाऊन कसोटीत अनेक रेकॉर्ड्स, आफ्रिकाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, भारताच्या फलंदाजांनीही नांगी टाकली
IND vs SA Stats & Records : केपटाऊन येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी अनेक विक्रम झाले. भारत आणि आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाचा पहिला डाव आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 55 धावांत आटोपला. मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. 55 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताचाही डाव कोसळला. केपटाऊन कसोटीच्या पहिल्याच दिवशी तब्बल 23 फलंदाज तंबूत परतले, हा एक विक्रमच झालाय... वाचा सविस्तर
4th January In History : शास्त्रज्ञ न्यूटन यांचा जन्म, केसरी वर्तमानपत्राची सुरुवात, संगीतकार पंचमदा यांचं निधन; आज इतिहासात
4th January In History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. चार जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. महान भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आयझॅक न्यूटन यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. तर ब्रेल लिपीचे निर्माते लुई ब्रेल (Louis braille) यांच्या जन्मदिनानिमित्त चार जानेवारी हा जगभरात ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्याच दिवशी पुण्यात केसरी वर्तमानपत्राची सुरुवात झाली होती... वाचा सविस्तर
Horoscope Today 4 January 2024 : आजचा गुरुवार खास! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 4 January 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच, 4 जानेवारी 2024 रोजी गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, कर्क राशीच्या लोकांनी आज आपल्या व्यवसायात अत्यंत सावधगिरीने काम करावे. तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व कामे पूर्ण करावीत. तूळ राशीच्या लोकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, त्यांची प्रकृती बिघडू शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर