4th January In History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. चार जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. महान भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आयझॅक न्यूटन यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.  तर ब्रेल लिपीचे निर्माते लुई ब्रेल (Louis braille) यांच्या जन्मदिनानिमित्त चार जानेवारी हा जगभरात ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्याच दिवशी पुण्यात केसरी वर्तमानपत्राची सुरुवात झाली होती. 


1641 : चार्ल्सचा पराभव (charles)


इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याला पराभवाचा सामना करावा लागला होता. कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी  पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला होता. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली होती. या युद्धामुळे चार्ल्सला पराभवाचा सामना करावा लागला. या युद्धामध्ये चार्ल्सचा शिरच्छेद करण्यात आला होता.


1643 : आयझॅक न्यूटनचा जन्म (Isaac Newton) 


महान भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आयझॅक न्यूटन  यांचा आज जन्मदिन. इंग्लंड मधील लिंकनशायर शहरातील वुलस्टोर्प येथे न्यूटन यांचा जन्म झाला होता.  न्यूटनने प्रकाश, गती आणि गणितात अनेक शोध लावले. न्यूटनने सांगितले की पांढरा रंग इंद्रधनुष्यातील सात रंगांचे मिश्रण आहे. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत मांडला. सूर्याच्या चारही बाजूंना फिरणाऱ्या ग्रहांच्या संबंधात गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितला.  न्यूटन यांनी 17 व्या शतकात लावला पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तू चया च्या विरुद्ध दिशेने असते त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शुन्य होते. मग ती वस्तु आणखी.वर न जाता खाली पडायला लागते.खाली पडताना तिच्या. गतीत गुरुत्वीय बलामुळेच सतत वाढ होत जाते. न्यूटनचे गतीविषयक तीन नियम सांगितले होते.   


1809:  लुई ब्रेल यांचा जन्म (World Braille Day) 


ब्रेल लिपीचे निर्माते लुई ब्रेल (Louis braille) यांचा आज जन्मदिन.लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत, लिपी विकसित केली. त्यांचा जन्म चार जानेवारी 1809 रोजी फ्रान्समध्ये झाला होता. त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने जगभरात ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक ब्रेल दिन हा अंध आणि दृष्टिबाधित व्यक्तींसाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांची पूर्ण जाणीव करून देण्यासाठी साजरा करण्यात येतो. 
 
लुई ब्रेल यांनी शोधलेली लिपी आज अनेक अंध व्यक्तींसाठी शिक्षणाचं माध्यम झाली आहे. ब्रेल यांच्या नावावरुन याला ब्रेल लिपी असं म्हटले जाते. 2019 पासून जगभरात चार जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 



1881 : केसरी वर्तमानपत्राची सुरुवात -


लोकमान्य टिळक यांनी पुण्यात केसरी वर्तमानपत्राची सुरुवात केली होती. जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी टिळकांनी केसरी वर्तमानपत्र सुरू केले होते. केसरी वर्तमानपत्राचे पहिले  संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. त्यांनी 1889 पर्यंत संपादक म्हणून काम पाहिलं. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता झटक्यात वाढली. परंतु पुढे टिळक व आगरकर यांच्यातील वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे  'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले. इंग्रज सरकारविरोधात टिळकांनी पाचशेपेक्षा जास्त अग्रलेख लिहिले होते. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? उजाडले पण सुर्य कुठे आहे? यासारख्या मथळ्यासह टिळकांचे संपदकीय लेख वाऱ्यासारखे लोकांच्या मनात उतरले होते.  


1908 : राजारामशास्त्री भागवत यांचं निधन


आजच्याच दिवशी 1908 मध्ये राजारामशास्त्री भागवत यांचं निधन झालं होतं. विद्वान, समाजसुधारक, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र यांनी आयुष्यभर समाजाच्या हितासाठी काम केलं. त्यांचं शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिंदूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. ११ नोव्हेंबर १८५१ रोजी रत्नागिरीतील  कशेळी, राजापूर येथे त्यांचा जन्म झाला होता. 


1926 : काकोरी खटल्याला सुरुवात 


भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही काकोरी घटनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याच काकोरी खटल्याला आजच्याच दिवशी 1926 मध्ये लखनौ येथे सुरुवात झाली होती. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात क्रांतिकारी पार्टीसाठी पैसा जमा करण्यासठी लखनौ जवळच्या काकोरी येथे सर्व क्रांतिकारक जमा झाले. 9 ऑगस्ट 1925 च्या रात्री काकोरी आणि आलमनगर रेल्वे स्थानकादरम्यान सहारनपूर लखनौ एक्स्प्रेसमधील इंग्रजांचा सोने- चांदीचा खजिना लुटण्यात आला. अवघे दहा पंधरा क्रांतिकारक विरुद्ध इंग्रज असा सामना झाला होता. या काकोरी कटात सहभागी असल्यामुळे  भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामातील राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये फाशी दिली होती.


1932 : पंडित जवाहरलाल नेहरू यांना अटक 


सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोन वर्षांची शिक्षा  झाली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरु झाली होती.  भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाच्या चळवळीपैकी एक चळवळ म्हणून याला ओळखलं जातं. 1932 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे वायसराय विलिंगडन यांनी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना अटक केली होती.  


1994 : संगीतकारआरडी बर्मन अर्थात पंचमदा यांचं निधन 


आरडी बर्मन अर्थात पंचमदा यांचं आजच्याच दिवशी 1994 मध्ये निधन झालं होतं. 70-80 च्या दशकात आरडी बर्मन यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या संगीताने छाप सोडली. आरडी बर्मन यांची गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात. आरडींनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पहिलं गाणं संगीतबद्ध केलं होतं. आणि बॉलिवूडमध्ये अवघ्या 17 व्या वर्षी पाऊल टाकलं होतं. तिसरी मंजिल, अमर प्रेम, आंधी, परिचय, मासूम, शोले, खेल खेल में, आप की कसम, किनारा आणि 1942 लव स्टोरी अशा सिनेमातील गाण्यांना संगीतबद्ध केलं आहे.


इतर महत्त्वाच्या घडामोडी : 


1909: मराठी नवसाहित्यिकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.
1914: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी कवियत्री इंदिरा संत यांचा जन्म.
1925: हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेते प्रदीप कुमार यांचा जन्म
1940: मराठी कादंबरीकार श्रीकांत सिनकर यांचा जन्म.
1948: ब्रम्हदेश (म्यानमार) देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
1962: न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.