Aamir Khan Kissed Ex Wife Kiran Rao : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नबंधनात अडकली आहे. पण भर मंडपात पहिली बायको रीना दत्तासमोर (Reena Dutta) दुसऱ्या बायकोला अर्थात किरण रावला (Kiran Rao) किस केल्याने आमिर सध्या चर्चेत आहे.


आमिर खानच्या लेकीच्या लग्नसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुपूरने हाफ पँट आणि टी-शर्ट अशा लूकमध्ये आयरासोबत लग्न केलं आहे. तर दुसरीकडे भर मंडपात पहिल्या बायकोसमोर दुसऱ्या बायकोला किस केल्याने 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान लाइमलाईटमध्ये आला आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्याची शाळा घेतली आहे.


'त्या' कृत्याने आमिर खान लाइमलाईटमध्ये


आयरा आणि नुपूर यांनी रजिस्टर मॅरेज केल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित मंडळी मंचावर येत होते. कौटुंबिक फोटोसाठी खान आणि शिखरे कुटुंबीय एकत्र आले होते. कौटुंबिक फोटोसाठी आमिर खान, किरण राव आपला मुलगा आजाद, नुपूर शिखरे, नुपूरची आई जुनैद, आयरा खान, आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता एकत्र उभे होते. त्यावेळी आमिर किरण रावच्या जवळ जात संवाद साधतो आणि तिच्या गालावर किस करतो आणि पुन्हा आपल्या पहिल्या पत्नीकडे जातो.






नेटकऱ्यांनी घेतली आमिरची शाळा


आमिर खानचा किरण रावला किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आमिर आणि किरणचा घटस्फोट झालाय ना? हिंमत लागते भावा पहिल्या पत्नीसमोर दुसऱ्या पत्नीला किस करायला, आमिर भाई सलाम, घटस्फोटाचा अर्थ काय असतो, आमिर ठर्की आहे, घटस्फोटानंतर आमिर असं कसं वागू शकतो?, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.


आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी आयरा आणि नुपूरच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होत्या. आमिर खान रीना दत्तासोबत 1986 मध्ये लग्नबंधनात अडकला होता. आयरा ही रीना आणि आमिरची लेक आहे. लग्नाच्या 16 वर्षांनंतर 2002 मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2005 मध्ये त्याने किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. पण त्यांचं नातंही फार काळ टिकलं नाही. अखेर 2021 मध्ये ते विभक्त झाले. 


संबंधित बातम्या


Ira Khan Nupur Shikhare Wedding : आमिर खानची लेक अडकली लग्नबंधनात; मराठमोळ्या नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज करत बांधली लग्नगाठ