देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Weather Update : थंडीत पावसाचा जोर! महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज; हवामान खात्याचा अलर्ट


Weather Update Today : थंडीची (Winter) वाट पाहत असलेल्या ठिकाणी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) लागली आहे. देशभरात विविध ठिकाणी गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस (Rain Updates) पाहायला मिळाला आहे. आजही राज्यासह देशात पावसाची शक्यता आहे. हवामाना विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात काही ठिकाणी पुढील 24 तासांत पावसाची हजेरी (IMD Rain Prediction) पाहायला मिळणार आहे. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळेल, असं आयएमडीने म्हटलं आहे. वाचा सविस्तर...


Maharashtra Weather : मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट, पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता


Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचं आयएमडी (India Meteorological Department) ने सांगितलं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्ये आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. वाचा सविस्तर...


Uttarkashi Tunnel Collapse : 41 मजुरांच्या सुटकेची जबाबदारी आता लष्करावर, भारतीय सैन्याची बचाव अभियानावर ड्रोन कॅमेऱ्याने नजर


Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशीतील (Uttarkashi) सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) 41 कामगारांचा जीव वाचवण्यासाठीचे प्रयत्न कायम आहेत. मागील 15 दिवसांहून अधिक काळ हे 41 मजूर बोगद्यामध्ये दगड आणि मातीच्या ढिगाऱ्यामध्ये अडकले आहे. बचावाकार्यात अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत. सुटकेसाठी खणलेल्या बोगद्यांच्या मार्गात अडथळे येत आहेत. शोध आणि बचावकार्यासाठी देशाच्या विविध भागांतून आणल्या जाणाऱ्या मशिन्सना सिल्क्यारा येथे नेण्यासाठीही  खराब रस्त्यांमुळे अडचणी येत आहेत. अजूनही बचावकार्य सुरू आहे, कामगार लवकरच बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे. वाचा सविस्तर...


Gold Price Today : लग्नसराईत सोने-चांदी दरवाढीतून दिलासा! तुमच्या शहरातील आजचे दर काय?


Gold Silver Rate Today, 27 November : तुळसी विवाहनंतर आता देशभरात लगीनघाई पाहायला मिळत आहे. अशात सराफा बाजार सोने-चांदी खरेदीसाठी (Gold Silver Price) लगबग पाहायला मिळत आहे. तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर आजचे सोने चांदीचे दर जाणून घ्या. गुडरिटर्न्स (Goodreturns) वेबसाईटनुसार, मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी  5,710 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,229 रुपये प्रति ग्रॅम आहे. वाचा सविस्तर...


27 November In History : नोबेल पुरस्काराची तरतूद, क्रिकेटसाठी काळा दिवस, फिलीप ह्यूजचा बाऊन्सर लागून मृत्यू; आज इतिहासात


27 November In History : नोबेल पुरस्काराच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. डायनामाईटचा शोध लावणाऱ्या अल्फ्रेड नोबेलने 27 नोव्हेंबर 1895 रोजी त्याच्या मृत्यूपत्रात नोबेल पुरस्काराची तरतूद केली आणि त्यासाठी आपली संपत्ती दिली. त्यानंतर 1901 रोजी नोबेल पुरस्काराची सुरूवात झाली. आज इतिहासात वाचा सविस्तर...


Horoscope Today 27 November 2023 : आजचे राशीभविष्य सर्व 12 राशींसाठी खास, या 5 राशींना सावध राहावे लागेल! जाणून घ्या


राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 27 नोव्हेंबर 2023, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज तूळ राशीच्या पाहुण्यांच्या आगमनामुळे कौटुंबिक वातावरण अतिशय प्रसन्न राहील. पाठदुखी किंवा डोकेदुखीशी संबंधित समस्या मकर राशीच्या लोकांना त्रास देऊ शकतात, म्हणूनच तुम्ही कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...