Gold Silver Rate Today, 27 November : तुळसी विवाहनंतर आता देशभरात लगीनघाई पाहायला मिळत आहे. अशात सराफा बाजार सोने-चांदी खरेदीसाठी (Gold Silver Price) लगबग पाहायला मिळत आहे. तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर आजचे सोने चांदीचे दर जाणून घ्या. गुडरिटर्न्स (Goodreturns) वेबसाईटनुसार, मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी  5,710 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,229 रुपये प्रति ग्रॅम आहे. 


लग्नसराईत सोने-चांदी दरवाढीतून दिलासा


ऐन लग्नसराईत सोन्याच्या दर वाढीतून दिलासा मिळाला आहे. आज सोन्याची किंमत स्थिर आहे, सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज 27 नोव्हेंबरला 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 57,100 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 46,720 रुपये प्रतितोळा आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 62,020 रुपये प्रति तोळा आहे. 


एक किलो चांदीचा दर काय? 


आज चांदीच्या दरातही कोणतीही वाढ झालेली नसून दर कायम आहेत. आज सोमवारी एक किलो चांदीचा दर 77,200 रुपये आहे. गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात वाढ झाली होती, आज मात्र यात काहीसा दिलासा मिळाला आहे.


देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)



  • मुंबई - मुंबईत सोन्याचा दर स्थिर असून 62,290 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)

  • दिल्ली - दिल्लीतही सोन्याचा दर आज कायम आहे. दिल्लीत सोनं 62440 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)

  • कोलकाता - कोलकातामध्ये सोन्याचा भाव 380 रुपयांनी वाढला आहे. कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 62290  रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)

  • चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 62780 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)

  • गाझियाबाद - 24 कॅरेट सोने 62440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 

  • नोएडा - 24 कॅरेट सोने 62440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 

  • पाटणा - 24 कॅरेट सोने 62340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.  

  • जयपूर - 24 कॅरेट सोने 62440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 

  • लखनौ - 24 कॅरेट सोने 62440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 


महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)



  • पुणे - 380 रुपयांनी महागलं 62020 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)

  • नाशिक - 360 रुपयांनी महागलं 62320 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate)

  • नागपूर - 380 रुपयांनी महागलं 62290 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate)

  • कोल्हापूर - 380 रुपयांनी महागलं 62290 रुपये  प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)


लग्नसराईत सोने खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा


सोने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला फसवणुकीपासून वाचवू शकता. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर सर्व प्रथम त्या दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते तपासा. नियमानुसार कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही.