Weather Update Today : थंडीची (Winter) वाट पाहत असलेल्या ठिकाणी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) लागली आहे. देशभरात विविध ठिकाणी गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस (Rain Updates) पाहायला मिळाला आहे. आजही राज्यासह देशात पावसाची शक्यता आहे. हवामाना विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात काही ठिकाणी पुढील 24 तासांत पावसाची हजेरी (IMD Rain Prediction) पाहायला मिळणार आहे. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळेल, असं आयएमडीने म्हटलं आहे.  काही 


महाराष्ट्रासह 'या' राज्यात पावसाची शक्यता


महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. पुढील 24 तासांतही या भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्येही पावसाची शक्यता आहे. 28 नोव्हेंबरला उत्तराखंडमध्ये पाऊस पडू शकतो. छत्तीसगडच्या अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि दिल्लीमध्येही आज सोमवारी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


पर्वतीय भागात दोन दिवस बर्फवृष्टीसह पावसाचा अंदाज


हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमलामध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबरला पर्वतीय भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. IMD हिमाचल प्रदेशचे प्रमुख सुरेंद्र पॉल यांनी दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, 26 नोव्हेंबरपासून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल होईल. वेस्टर्न डिस्टर्बन्सची तीव्रता हलकी ते मध्यम आहे, त्यामुळे जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता नाही. 27 नोव्हेंबरपर्यंत किन्नौर, लाहौल-स्पीती, कुल्लू,आणि शिमला भागात बर्फवृष्टी होईल. सिरमौर, सोलन, मंडी आणि कांगडा येथील सखल भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 आणि 29 नोव्हेंबरला बर्फवृष्टी कमी होईल आणि हवामान स्वच्छ राहील.


डिसेंबरमध्ये थंडीचा जोर वाढणार


नोव्हेंबर संपत आला असली तरी, खऱ्या अर्थाने थंडीचा कडाका अद्याप जाणवत नाहीय. मात्र, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून कडाक्याची थंडी वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये पुढील तीन दिवस पाऊस आणि हिमवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या बचावकार्यातही अडथळा निर्माण होणार आहे.