देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


इतिहासाची आस, लॅण्डिंगचा ध्यास; पण चांद्रयान-3 साठी शेवटची 15 मिनिटं धोक्याची, नेमकं काय होणार शेवटच्या 900 सेकंदात?


Chandrayaan 3: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-3 आज संध्याकाळी 6 वाजून 4  मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. भारताच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अत्यंत गौरवाची चांद्रयान-3 मोहीम... चांद्रयान-3 ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मात्र यामध्ये शेवटची 15 मिनिटं धोक्याची असणार आहे. वाचा सविस्तर


Rakesh Sharma : पहिले आणि एकमेव भारतीय अंतराळवीर, राकेश शर्मा सध्या काय करतात?


मुंबई : सध्या अवघ्या जगाच्या नजरा चांद्रयान-3 वर आहेत. अंतराळाचा विषय निघाला तर आपण, राकेश शर्मा यांना विसरु शकत नाही. अंतराळात प्रवास करणारे पहिले आणि एकमेव भारतीय नागरिक राकेश शर्मा यांच्याबद्दल सर्वांनाच माहित आहे. राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. त्यांच्यानंतर आजपर्यंत एकही भारतीय अंतराळात गेला नाही. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स याही अंतराळात गेल्या त्या भारतीय वंशाच्या आहेत, पण भारतीय नागरिक नाहीत. वाचा सविस्तर


पुढील 5 दिवस उत्तर भारतासह अनेक राज्यात मुसळधार पावसाचा इशारा


Weather Update : देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. विशेषत: उत्तर भारतात पावसाचा जोर अधिक आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही देशाच्या राजधानीसह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाहुयात आज कुठे कुठे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा सविस्तर


आज कच्च्या तेलाचे दर काय? त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांवर परिणाम होणार?


Petrol-Diesel Price Today: महागाईनं सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे. अशातच वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांनी धसका घेतला आहे. भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल केला जातो आणि नवे दर जाहीर केले जातात. पण, गेल्या दीड वर्षापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. वाचा सविस्तर


यावर्षी भारतात 330 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा  


Sugar News : गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेच्या किंमतीत (Sugar Price) 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशातील साखरेची सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 43.30 रुपये इतकी राहिली आहे. किंमती सध्या याच मर्यादेत राहण्याची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षात देशात साखरेच्या किमतीत 2 टक्क्यांपेक्षा कमी वार्षिक महागाई दर राहिला असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. दरम्यान, यावर्षी भारतात 330 लाख मेट्रीक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तर साखरेचा देशांतर्गत खप सुमारे 275 लाख मेट्रीक टन राहण्याचा अंदाज आहे. वाचा सविस्तर


वृषभ, सिंह, तूळ राशीसह 'या' राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


Horoscope Today 23 August 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तर, तूळ राशीच्या लोकांना आज कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर


चांद्रयान-3 चं चंद्रावर लँडिंग होणार, महाविकास आघाडीची बैठक; आज दिवसभरात


23rd August Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज बहुप्रतिक्षित भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचं चंद्रावर लँडिंग होणार आहे, तर इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. कांद्याच्या वाढीव निर्यात शुल्काविरोधात नाशिकमधील कांदा लिलाव सलग तिसऱ्या दिवशी ठप्प असणार आहे. वाचा सविस्तर


अमेरिकेविरोधात हळदीच्या पेटंटची कायदेशीर लढाई भारताने जिंकली; आज इतिहासात...


23rd August In History :  आजचा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.  भारताने आजच्या दिवशी अमेरिकेविरोधात हळदीच्या पेटंटची लढाई जिंकली होती. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी हळदीच्या औषधी गुणधर्माचे पेटंट मिळवले होते. त्यावर भारताने आक्षेप घेत कायदेशीर लढाई लढली. त्याशिवाय, मराठीमधील बालकवितेसह वास्तववादी कवितांमधून समाजाला आरसा दाखवणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचा जन्म झाला. त्याशिवाय, सुप्रसिद्ध गायक केके यांचा जन्मदिन आहे. वाचा सविस्तर