Chandrayaan 3: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-3 आज संध्याकाळी 6 वाजून 4  मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. भारताच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अत्यंत गौरवाची चांद्रयान-3 मोहीम... चांद्रयान-3 ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मात्र यामध्ये शेवटची 15 मिनिटं धोक्याची असणार आहे


भारताच्या चांद्रयानाच्या लॅण्डिंगचं काऊंटडाऊन सुरू झालंय आणि उद्या संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-३ चंद्रावर उतरणार आहे. लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झालीय. मात्र शेवटच्या 15 मिनिटांमुळे का वाढली धाकधुक वाढली आहे.  शेवटचे 15 मिनिट म्हणजेच 900 सेकंद ज्याच्यावर भारताचं मिशन चांद्रयान-3 चं यश अवलंबून आहे ते 15 मिनिट भारताच्या आंतराळ मिशनचं चित्र कायमचं बदलून टाकणार आहे.  चांद्रयान  15  मिनिट आव्हानांवर मात करुन नवा इतिहास रचणार आहे. 


चांद्रयान 3 साठी शेवटचे पंधरा मिनिटं कसोटीचे?


2019 मध्ये चांद्रयान-2 यशाच्या जवळ होतं लॅण्डर मॉड्यूलने चंद्राच्या पृष्ठभागावर 2.1 किमी उंची गाठली होती. किरकोळ तांत्रिक  बिघाड झाला आणि  लॅण्डर क्रॅश झालं. त्यामुळे चांद्रयान-3साठी  ते शेवटचे 15 मिनिटं महत्त्वाची मानली जातात. भारतीय वेळेनुसार 23 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चं लॅण्डर चंद्रावर लॅण्ड होईल पण त्या आधीचे १५ मिनिटं निर्णायक असतील कारण लॅण्डिंगची प्रक्रिया त्या शेवटच्या पंधरा मिनिटातच होणार आहे. 


चांद्रयान-3 लॅण्डिंगचे चार टप्पे



  • चंद्राच्या पृष्ठभागापासून  लॅण्डरची उंची 800 मीटर ते 1300 मीटर असेल

  • विक्रमचे सेन्सर्स कार्यान्वित  होतील आणि त्याची उंची मोजली जाईल

  • पुढच्या 131 सेकंदात लॅण्डर पृष्ठभागापासून 150 मीटरवर येईल

  • लॅण्डवरचा धोका शोधक  कॅमेरा पृष्ठभागाच्या प्रतिमा कॅप्चर करेल

  • विक्रमवर बसवलेला  धोका शोधणारा  कॅमेरा रन करेल

  • प्रतिकूल परिस्थिती असेल तर विक्रम 73 सेकंदात चंद्रावर उतरेल

  • जर नो- गो अट असेल तर 150 मीटर पुढे जाऊन थांबेल

  • पुन्हा पृष्ठभाग तपासेल  आणि सर्व ठीक असेल तर लॅण्ड होईल


यावेळी सर्वात मोठं आव्हान चांद्रयान-3 चा स्पीड कमी करण्याचं आहे. लॅण्डरमध्ये लावण्यात आलेलं रॉकेट लॅण्डिंगचा स्पीड कंट्रोल करेल. चांद्रयान-2 च्या मोहीमेची पुनरावृत्ती नको म्हणून इस्त्रोने काळजी घेतली आहे.  चांद्रयान-3 चंद्रावर पोहचण्यासाठीआता अवघे काही तास उरलेत  जसा चांद्रयान 3 चा 44 दिवसांचा प्रवास सुखरुप झाला. तसाच शेवटच्या 15 मिनिटांमध्येही कोणते विघ्न येऊ नये.


हे ही वाचा :


 पहिले आणि एकमेव भारतीय अंतराळवीर, राकेश शर्मा सध्या काय करतात?