Sugar News : गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेच्या किंमतीत (Sugar Price) 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशातील साखरेची सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 43.30 रुपये इतकी राहिली आहे. किंमती सध्या याच मर्यादेत राहण्याची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षात देशात साखरेच्या किमतीत 2 टक्क्यांपेक्षा कमी वार्षिक महागाई दर राहिला असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. दरम्यान, यावर्षी भारतात 330 लाख मेट्रीक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तर साखरेचा देशांतर्गत खप सुमारे 275 लाख मेट्रीक टन राहण्याचा अंदाज आहे. 


साखरेचा देशांतर्गत खप  सुमारे 275  लाख मेट्रीक टन राहण्याचा अंदाज


ओणम, रक्षाबंधन आणि कृष्ण जन्माष्टमी या आगामी सणासुदीच्या काळात  साखरेच्या मागणीत मोठी वाढ होत असते. ही मागणी लक्षात घेऊन, ऑगस्ट 2023 या महिन्यासाठी 2 लाख मेट्रिक टन अतिरिक्त कोट्याचे  नियतवाटप करण्यात येत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्ध होणारी अतिरिक्त साखर देशभरात वाजवी किमती सुनिश्चित करेल असे केंद्र सरकारनं म्हटलं आहे. चालू साखर हंगामात (ऑक्टोबर -सप्टेंबर) 2022-23 मध्ये, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे 43 एलएमटी साखर  वळवल्यानंतर भारतात 330 एलएमटी  साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखरेचा देशांतर्गत खप  सुमारे 275  एलएमटी राहण्याचा अंदाज केंद्र सरकारनं वर्तवला आहे. सद्यस्थितीत चालू साखर हंगाम 2022-23 च्या उर्वरित महिन्यांसाठी  देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारताकडे पुरेसा साखरेचा साठा आहे. या हंगामाच्या अखेरपर्यंत म्हणजे 30. सप्टेंबर 2023 पर्यंत  60 लाख मेट्रीक टन (अडीच महिन्यांसाठी साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी पर्याप्त) साखर उपलब्ध असेल असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.. 


साखरेच्या किमतीतील अलीकडील वाढ लवकरच योग्य स्तरावर येईल. पुढील हंगामापूर्वी जुलै-सप्टेंबर दरम्यान दरवर्षी किमती वाढतात आणि नंतर ऊस गाळप सुरू झाल्यावर कमी होतात. त्यामुळे साखरेची दरवाढ अत्यंत नाममात्र आणि अल्प कालावधीसाठी असल्याचे केंद्र सरकारनं म्हटलं आहे.


10 वर्षांत साखरेच्या उत्पादनात लक्षणीय वाढ


चालू साखर हंगामात (ऑक्टो-सप्टेंबर) 2022-23, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे 43 लाख मेट्रिक टन ऊस वापरल्यानंतरही भारतात सुमारे 330 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. अशा प्रकारे, देशातील एकूण साखर उत्पादन सुमारे 373 लाख मेट्रिक टन असेल जे गेल्या पाच वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचे उच्चांकी उत्पादन आहे. शिवाय, गेल्या 10 वर्षांत साखरेच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Raju Shetti : दिल्लीत शेट्टींनी घेतली गडकरींची भेट, इथेनॅालच्या किंमतीसह साखर निर्यातीच्या धोरणावर मार्ग काढण्याची मागणी