एक्स्प्लोर

Morning Headlines 1st September : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

₹2000 नोट बदलीचे शेवटचे 30 दिवस! कुठे चुकून राहिलीय का दोन हजाराची नोट, चेक करा

मुंबई : रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा मे महिन्यात केली. त्यानंतर बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सप्टेंबर महिना अखेरपर्यंत मुदत असून आता अखेरचे 30 दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक घरातील गृहिणींचा एक छुपा बटवा अथवा डबा असतोच त्यामुळे या छुप्या बटव्यामध्ये  चुकून एखादी नोट राहण्याची शक्यता आहे. नोट असेल तर काळजी करु नका कारण 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेकडे जमा करायच्य आहेत. वाचा सविस्तर

आज महिन्याचा पहिला दिवस, वाढले की घटले पेट्रोल-डिझेलचे दर?

Petrol Diesel Price: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केल्या जातात. आजही देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट केले आहेत. आज 1 सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस, आजपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये काहीतरी बदल होतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र आजही पेट्रोल-डिझेलत्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. वाचा सविस्तर

मिशन आदित्यद्वारे अंतराळ संशोधनामध्ये इस्रोचं आणखी एक महत्त्वाचं पाऊल, किती महत्त्वाची आहे ही मोहीम?

श्रीहरिकोटा : मंगळ आणि चंद्राची यशस्वी मोहीम झाल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आता सूर्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी इस्रो आता सज्ज झाला असून सौरमंडळाचा अभ्यास भारत करणार आहे. यामुळे सूर्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा करण्यास इस्रोला मदत होणार आहे. वाचा सविस्तर

आज पहली तारीख है... देशात आजपासून 'हे' मोठे बदल; सर्वसामान्यांच्या बजेटवर थेट परिणाम

Rule Change From 1st September 2023: आज सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस... प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात अनेक बदल घडतात, त्याचप्रमाणे आज 1 सप्टेंबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. तसेच, काही नियमांमुळे तुमचं महिन्याभराचं आर्थिक बजेट कोलमडण्याचीही शक्यता आहे. या बदलांचा परिणाम शेअर बाजारापासून स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत सगळीकडे दिसून येणार आहे. त्यामुळे या बदलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. वाचा सविस्तर

जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, 105 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष

Jaya Verma Sinha : केंद्र सरकारने जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या 105 वर्षांच्या इतिहासात हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. जया वर्मा सिन्हा या आज (1 सप्टेंबर 2023) आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. वाचा सविस्तर

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, दारुच्या नशेत कृत्य केल्याची माहिती

Mantralaya Bomb Threat: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला अहमदनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील बाळकृष्ण ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. बाळकृष्ण ढाकणे याने गुरुवारी (31 ऑगस्ट) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास 112 वर फोन करून मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, असं म्हणत मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. वाचा सविस्तर

वृषभ, कर्कसह 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 1 September 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांना नोकरीत अधिका-यांची साथ मिळेल, पण बदली होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. मेष ते मीन राशीसाठी आजचा शुक्रवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना, जपानमधील भूकंपात 1 लाख 43 हजार लोक ठार; आज इतिहासात

1st September In History: आज सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. भारतीय आयुर्विमा महामंडळाची, म्हणजेच LIC ची स्थापना आजच्या दिवशी झाली. LIC ही सरकारमान्य विमा कंपनी आहे, संकटकाळात अर्थसहाय्य पुरवते. आजच्या दिवशी जपानमध्ये महाकाय भूकंप आला होता, ज्यात जवळपास 1 लाख 43 हजार जणांना आपला जीव गमवावा लागला. आजच्या दिवशी इतरही कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे आजच्या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया. वाचा सविस्तर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
Embed widget