देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील


संसदेच्या विशेष अधिवेशन आजपासून सुरु होणार, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?


नवी दिल्ली : संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनाला आजपासून (18 सप्टेंबर) सुरुवात होत आहे.  सरकारने याची घोषणा करताना हे 'विशेष अधिवेशन' असल्याचं म्हटलं होतं. परंतु नियमित अधिवेशन असल्याचं नंतर स्पष्ट करण्यात आलं. हे अधिवेशन सध्याच्या लोकसभेचं तेरावं आणि राज्यसभेचं 261 वं अधिवेशन असल्याचं म्हटलं. हे अधिवेश 22 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान सभागृहाचं कामकाज सकाळी 11  ते दुपारी 1 मग दुपारी 2 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहिल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज राज्यसभेत 75 वर्षांचा संसदीय प्रवास, कामगिरी, अनुभव, आठवणी यावर चर्चा होणार आहे. वाचा सविस्तर


महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा, सत्तासंघर्षाबाबत दोन याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज (18 सप्टेंबर) महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. दोन्ही प्रकरणं ही शिवसेनेशी संबंधित आहेत. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या‌ याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात दाखल याचिकेबाबतही सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पारडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकांचे क्रमांक अनुक्रमे 18 तसंच 19 असे आहेत. वाचा सविस्तर


ग्राहकांना चॉकलेट पाठवून EMI भरण्याची आठवण करुन देणार, SBI ची गांधीगिरी


मुंबई : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी सरकार बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल आणि तुम्ही बँकेतून कर्ज घेतलं असेल तर तुमच्याकडून एकही ईएमआय (EMI) चुकणार नाही याची काळजी घ्या.  तुमचा एखादा जरी हफ्ता चुकला तर त्याची आठवण करुन देण्यासाठी बँकेने खास मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. एसबीआयची ही मोहीम अशा ग्राहकांसाठी आहे, ज्यांच्याबाबत बँकेला ईएमआय चुकण्याची शंका आहे. वेळेवर कर्जाचे हफ्ते भरावेत यासाठी बँकेने नवीन मोहीम आणली आहे. ही मोहीम काय याची उत्सुकता नक्कीच वाढली असेल, तर याबाबत जाणून घेऊया. वाचा सविस्तर


महाराष्ट्र काश्मीरच्या मैत्रीचा नवा अध्याय, 'सरहद'च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही


श्रीनगर : काश्मीरच्या तरुणांसाठी 'सरहद' संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व ते पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून पुणे येथील 'सरहद' संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या 'हम सब एक है' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. वाचा सविस्तर


मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी युवकाची आत्महत्या; नांदेडच्या कामारी गावातील घटना


नांदेड : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापला आहे. दरम्यान, यावरुन संपूर्ण राज्यात आंदोलन केले जात आहे. तर नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी युवकाने आत्महत्या करुन जीवन संपवलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सुदर्शन देवराये असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. वाचा सविस्तर


मध्य प्रदेशात पावसाचा हाहाकार, उज्जैन आणि ओंकारेश्वरला महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची भीती


बुलढाणा : मध्य प्रदेशातील दक्षिण भागात गेल्या  48 तासांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नर्मदा आणि  शिप्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धोक्याच्या पातळीवरुन या दोन्ही नद्या सध्या वाहत आहेत. ओंकारेश्वर जलाशयातील पाण्याचा मोठा विसर्ग ही नर्मदा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. त्यामुळे नर्मदा नदीला महापूर आल्याचं पाहायला मिळतयं. तसेच या महापुरामुळे  उज्जैन - इंदूर - बुऱ्हाणपूर - सोलापूर हा महामार्ग मागील 24 तासांपासून बंद ठेवण्यात आलाय.  मोरटक्का येथील नर्मदा नदीच्या पुलापासून केवळ दोन फुटांच्या अंतरावर पाणी आलंय. त्यामुळे हा महामार्ग मागील 24 तासांपासून बंद आहे. वाचा सविस्तर


तूळ, धनूसह या राशींना धनलाभ; तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? आजचं राशीभविष्य 


मुंबई : आज 18 सप्टेंबर, सोमवारचा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. यादिवशी शिव शंकराची आराधना करणं लाभदायक ठरेल. आज 18 सप्टेंबरचा दिवस कोणत्या राशीसाठी शुभ जाणार आहे आणि कोणत्या राशीच्या लोकांना आज सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वाचा सविस्तर


कट्टर शत्रू इस्त्रायल-इजिप्तमध्ये अरब राजकारणाला कलाटणी देणारा कॅम्प डेव्हिड करार, शबाना आझमी यांचा जन्म; आज इतिहासात


मुंबई : एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या इजिप्त आणि इस्त्रायलने 18 सप्टेंबरला ऐतिहासिक अशा करारावर स्वाक्षरी केली. इस्त्रायल आणि इजिप्त हे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. पण या दोन देशांनी एकत्रित येऊन शांती करार केला. इजिप्तच्या अन्वर सादत यांच्या भूमिकेवर त्यावेळी अरबी राष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. तसेच आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये वेगळा ठसा उमटवणाऱ्या शबाना आझमी यांचा जन्म आजच्या दिवशीच झाला. वाचा सविस्तर