मुंबई : आज 18 सप्टेंबर, सोमवारचा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. यादिवशी शिव शंकराची आराधना करणं लाभदायक ठरेल. आज 18 सप्टेंबरचा दिवस कोणत्या राशीसाठी शुभ जाणार आहे आणि कोणत्या राशीच्या लोकांना आज सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या.


मेष (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज ऑफिसमध्ये तुमच्या कामासाठी तुमचं कौतुक होऊ शकतं. जर तुम्ही कर्ज घेण्याच्या किंवा कोणाकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर, आज यासंदर्भात कोणतंही काम करु नका. जुन्या मित्रांकडून सहकार्य मिळेल. कुटुंबियांसोबत आनंदी दिवस जाईल.


वृषभ (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप धावपळीचा आणि व्यस्त असेल. तब्येतीची काळजी घ्या. कोणतीही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा आणि सावधगिरी बाळगा. आज प्रलंबित कामं पूर्ण होतील. एखादं काम करत असाल तर, मनापासून करा. भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घ्याल.


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांनी आज अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे. तुमच्या खिशातून काही पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्या. आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित लाभ होऊ शकतो, यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. 


कर्क (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय लाभदायक ठरेल. तुमच्या मेहनतीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमचा तुमच्या मुलांवरील विश्वास अधिक दृढ होईल. आज वडीलधाऱ्यांकडून प्रेम आणि विशेष सहकार्य मिळेल. दिवस थोडासा खर्चिक जाईल पण, त्यात समाधान मिळेल.  शत्रूकडून फायदा होईल. 


सिंह (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. मानसिकदृष्ट्या मन अस्वस्थ राहील. तुमच्या पालकांचं सहकार्य लाभेल आणि त्यामुळे आर्थिक लाभ मिळेल. आजच्या दिवशी वाणीवर आवर ठेवा आणि शब्द जपून वापरा. आज तुमचे अडकलेले व्यवहार सुरळीत होऊन फायदा होईल.


कन्या (Virgo)


कन्या राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल. तुमच्या पालकांकडून विशेष सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. मोठे निर्णय नीट विचारपूर्वक घ्या.


तूळ (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आज दिवस शुभ असून धनलाभ होईल आहे. तुमच्या संपत्ती वाढ होईल. तुम्ही इतरांची सेवा करण्याची संधी मिळेल. कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर, आजचा दिवस अत्यंत शुभ ठरेल. या कामात तुम्हाला नफा मिळेल.


वृश्चिक (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित परिणाम मिळेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला फायदा होईल. जुने वाद मिटतील. कोणतेही प्रकरण किंवा वाद प्रलंबित असल्यास त्यातही तुमचा विजय होईल. यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.


धनु (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुमच्या संपत्तती वाढ होईल. ऑफिस आणि कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा.


मकर (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. तुम्हाला व्यवसायात नफाही मिळेल. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून सन्मान मिळेल. अनावश्यक खर्च देखील उद्भवू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील. जर तुम्हाला नवीन कामात गुंतवणूक करायची असेल तर आजच्या दिवशी नक्कीच करा.


कुंभ (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस लाभदायक आहे. जास्त खर्चाची शक्यता आहे, त्यामुळे हात राखून आणि गरजेनुसारच खर्च करा. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मदत करावी लागू शकते. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. प्रवासाचा योग आहे


मीन (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिक लाभाचा असून आज तुम्हाला धनलाभ होईल. जुना वाद-भांडणे मिटतील. तुमच्या आनंदी व्यक्तिमत्वामुळे इतर लोक तुमच्याशी संपर्कात येतील. सामाजित पातळीवर तुमचं कौतुक होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Ganesh Chaturthi 2023 : यंदा गणेश चतुर्थीला अद्भुत योग, 'या' राशीच्या लोकांना होणार धनलाभ