देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
India vs New Zealand Semifinal, World Cup 2023: मुंबईच्या वानखेडेवर आज महासंग्राम; न्यूझीलंडचा वचपा अन् फायनल गाठण्यासाठी टीम इंडिया मैदानात
India vs New Zealand Semifinal, World Cup 2023: मुंबईचं (Mumabi News) ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) सज्ज झालंय विश्वचषकाच्या (ICC World Cup 2023) पहिल्या सेमीफायनलसाठी (World Cup Semifinal). या सामन्यात यजमान टीम इंडियाचा (Team India) मुकाबला न्यूझीलंडशी (New Zealand) होणार आहे. विश्वचषकाच्या (World Cup 2023) साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या (Kane Williamson) न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. वाचा सविस्तर
IND vs NZ Semifinal: वानखेडेवर टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड द्वंव्द; रोहितसेना विल्यमसनच्या टोळीचं चक्रव्यूह भेदणार?
IND vs NZ, Wankhede Stadium Pitch Report: विश्वचषकातील सेमीफायनलच्या (World Cup 2023 Semi Final) सामन्यांना आजपासून सुरुवात होणार आहे. आज मुंबईतील (Mumbai) ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तसेच, हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. वानखेडे मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान, वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं आहे. या खेळपट्टीवर फलंदाज मोठे फटके सहज मारतात. मात्र गोलंदाजांसाठी आव्हान सोपं नसेल. वाचा सविस्तर
Maharashtra Weather : पुढील 4 दिवस पावसाची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
Weather Update Today : अरबी समुद्रात (Arebian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या देशात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस या भागात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, दक्षिणपूर्व बंगाल उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात 14 नोव्हेंबरपासून पावसाचा नवा टप्पा सुरू ( Weather Update ) होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Assembly Election 2023 : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांची ताकद पणाला
MP & Chhattisgarh Assembly Election 2023 : आज छत्तीसगड (Chhattisgarh) आणि मध्य प्रदेशामध्ये (Madhya Pradesh) निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा (Election Campaign) थंडावणार आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये (Assembly Election 2023) आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रचार थांबणार आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा (Madhya Pradesh and Chhattisgarh Assembly Election 2023) निवडणुकांबाबत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 17 नोव्हेंबरला येथे मतदान पार पडणार असून यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वाचा सविस्तर
1976 मध्ये चिटफंड कंपनीचं अधिग्रहण, 1978 मध्ये 'सहारा इंडिया'ची स्थापना; एकापाठोपाठ एक यशाची शिखरं सर करणारे सुब्रत रॉय
Sahara India Pariwar Founder Subrata Roy: सहारा इंडियाचे (Sahara India Pariwar) संस्थापक सुब्रत रॉय (Subrata Roy) यांचं वयाच्या 75 व्या वर्षी 14 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झालं. मुंबईतील (Mumbai News) कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहारा समूहानं (Sahara Group) एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, सुब्रत रॉय यांचं मंगळवारी रात्री 10.30 वाजता कार्डियाक अरेस्टमुळे निधन झालं. त्यांना ब्लड प्रेशर आणि डायबिटीजसारख्या आजारांनी ग्रासलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती, त्यामुळे त्यांना 12 नोव्हेंबर रोजी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वाचा सविस्तर
15 November In History : महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला फाशी, सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमध्ये पदार्पण; आज इतिहासात...
15 November In History : जगाच्या आणि देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने 15 नोव्हेंबर हा दिवस अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्या दिवशी इतिहासात लीग ऑफ नेशन्सची पहिली बैठक पार पडली. तसेच सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आजच्याच दिवशी आदिवासी राज्य असलेल्या झारखंडची स्थापना करण्यात आली. वाचा सविस्तर
Horoscope Today 15 November 2023 : आजचा बुधवार खास! फक्त 4 राशींनी टाळावं 'हे' काम; जाणून घ्या 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 15 November 2023 : राशीभविष्यानुसार आज (Horoscope Today) म्हणजेच 15 नोव्हेंबर 2023 रोजी बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, आज मेष राशीच्या लोकांना घर किंवा ऑफिसमध्ये काही मुद्द्यावर अपमान सहन करावा लागू शकतो. कर्क राशीचे लोक एखाद्याच्या लग्न किंवा वाढदिवसाला उपस्थित राहू शकतात, जिथे तुम्हाला खूप आनंद मिळेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊया, वाचा सविस्तर