MP & Chhattisgarh Assembly Election 2023 : आज छत्तीसगड (Chhattisgarh) आणि मध्य प्रदेशामध्ये (Madhya Pradesh) निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा (Election Campaign) थंडावणार आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये (Assembly Election 2023) आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रचार थांबणार आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा (Madhya Pradesh and Chhattisgarh Assembly Election 2023) निवडणुकांबाबत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 17 नोव्हेंबरला येथे मतदान पार पडणार असून यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 17 नोव्हेंबरला मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशात जोरदार प्रचार केला. 17 नोव्हेंबर रोजी, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणूक आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात प्रचाराचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस आज 15 नोव्हेंबरला आहे, त्याच्या अवघ्या 24 तासांपूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशमध्ये मोठी सभा घेतली. पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेश दौऱ्यावर इंदूरमध्ये रोड शो करून प्रचार थांबवला. भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा पुढचा मुक्काम झारखंड आहे.
मध्य प्रदेशात आदिवासींच्या मतावर सरकार ठरणार
मध्य प्रदेशात अनुसूचित जमातीच्या 47 जागा आहेत. गेल्या तीन निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर आदिवासींनी ज्या पक्षाला साथ दिली त्याच पक्षाने सरकार स्थापन केल्याचं स्पष्ट दिसून आलं. 2008 आणि 2013 मध्ये भाजपने सर्वाधिक 29 आणि 31 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपचा मार्ग सुकर झाला. तसेच, 2018 मध्ये काँग्रेसने एसटीसाठी राखीव असलेल्या 30 जागांवर कब्जा केला आणि भाजपला फक्त 16 जागांवर यश मिळालं. परिणामी सत्ता काँग्रेसच्या हातात गेली. पण, नंतर काँग्रेसमधील मतभेदाचा फायदा घेत भाजपने सरकार स्थापन केलं.
छत्तीसगडमध्येही आदिवासींची महत्त्वाची भूमिका
छत्तीसगडमध्येही आदिवासींची लोकसंख्या मोठी आहे. राज्यातील विधानसभेच्या 90 जागांपैकी 29 जागा राखीव आहेत. 2008 आणि 2013 मध्ये भाजपने 19 आणि 11 जागा जिंकल्या होत्या. तर 2018 मध्ये काँग्रेसने यापैकी 25 जागांवर कब्जा केल्यावर त्यांनी सत्ता काबीज केली.