देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
क्रूरकर्मा हमासचं निर्घृण कृत्य, तान्हुल्यांना संपवलं अन् मृतदेह तिथेच जाळले, नेत्यानाहूंच्या ट्वीटनं संपूर्ण जग हळहळलं
Israel Hamas War: इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बेन्जमीन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी ट्वीट केलेल्या काही फोटोंमुळे जग हादरून गेलं आहे. हमासनं (Hamas) इस्रायलच्या हद्दीत घुसून अनेकांची हत्या केली होती. त्यात अनेक तान्ह्या बाळांचं शिरकाण देखील करण्यात आलं होतं. त्यातल्या काही बाळांना तिथंच अक्षरशः जाळून टाकण्यात आलं होतं. हे फोटो पाहिलं की, ह्रदयाला पीळ पडतो. काही दिवसांचे हे जीव.... जग पाहणं तर सोडाच, या तान्हुल्यांना आपल्या आजुबाजूला काय सुरू आहे, हे देखील कळत नसतं. अशा परिस्थितीत त्यांची निर्घृण हत्या करणं, त्यानंतर त्यांचे मृतदेह तिथेच जाळून टाकणं, अशी कृत्य करणाऱ्यांना माणूस म्हणायलाही मन धजावत नाही. कारण काहीही असो, राग कितीही रास्त असो किंवा नसो... पण अशी हीन कृत्य जगात कुठेच आणि कधीच घडू नये इतकंच म्हणावंसं वाटतंय... नेतन्याहू यांच्या ट्वीटनं अवघं जग हळहळतंय. वाचा सविस्तर
Israel-Hamas War : इस्रायल-हमास संघर्ष सुरूच, इस्रायलमधून भारतात परतले 212 भारतीय, IDFचा हमासवर पुन्हा एअरस्ट्राइक
Israel-Hamas War : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. इस्रायलचे हवाई दल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेऊन भारत सरकारने ऑपरेशन 'अजय' सुरू केले आहे. इस्रायलमधून भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना परत आणणे हा त्याचा उद्देश आहे. इस्रायलमधून आतापर्यंत 212 भारतीय भारतात परतल्याचे वृत्त आहे. वाचा सविस्तर
Israel Gaza Attack: इस्रायल-हमास युद्धाचा आठवा दिवस, जोपर्यंत आमच्या नागरिकांना सोडत नाही, तोपर्यंत पाणी बंद; इस्रायलचा इशारा
Israel Gaza Attack: इस्रायल (Israel) आणि हमासमधील (Hamas) युद्धाचा आज आठवा दिवस... इस्रायलकडून गाझा (Gaza) पट्टीवर सतत बॉम्बहल्ले सुरू आहेत. हमासनं इस्रायलला आज मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता हमासनं इस्रायलविरोधात कुठला मोठा प्लॅन आखलाय, याबाबत अवघ्या देशाची धडधड वाढली आहे. काल दिवसभरात झालेल्या बॉम्बहल्ल्यात गाझा पट्टीत 150 हून अधिक मृत्यू झाले आहेत, तर मृतांचा एकूण आकडा चौदाशेच्या पार गेला आहे. गाझा पट्टीतले अनेक भाग पूर्णपणे बेचिराख झाले आहेत. तिकडे इस्रायलमध्येही 1 हजार 300 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्यांनी गाझामध्ये ऑपरेशन सुरू केलं आहे. हमासच्या एकएका अतिरेक्यांला शोधून ठार केलं जात आहे. इस्रायलनं अन्न, वीज आणि पाण्याचा पुरवठा बंद केल्यानं गाझा पट्टीतले 20 लाख रहिवाशी जेरीस आले आहेत. हमासनं अपहरण करून गाझा पट्टीत नेलेल्या इस्रायली नागरिकांना सोडेपर्यंत अन्न, पाणी आणि विजेचा पुरवठा सुरू करणार नाही, अशी अट इस्रायलनं घातली आहे. वाचा सविस्तर
Mahadev Online Gaming App Case: सौरभ चंद्राकर मुंबईजवळ पंचतारांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स बांधण्याच्या तयारीत होता? सूत्रांची माहिती
Mahadev Online Gaming App Case: महादेव अॅप प्रकरणासंदर्भात (Mahadev Online Gaming App) एक मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव बुक ॲप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar) हा मुंबईजवळ (Mumbai News) पंचतारांकित हॉटेल्स (Five Star Hotels) आणि रिसॉर्ट्स बांधण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, सट्टेबाजीत कमावलेल्या पैशांनी सौरभ चंद्राकर यांनी मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी अनेक बॉलिवूडकरही रडारवर असून या प्रकरणासंदर्भात नवनवी माहिती दररोज समोर येत आहे. वाचा सविस्तर
RBI Action: Paytm Payments बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका; ठोठावला 5.39 कोटींचा दंड, पण का?
RBI Action on Paytm Payments Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला (Paytm Payments Bank) नो युवर कस्टमर (Know Your Customer) निकषांसह काही तरतुदींचं पालन न केल्याबद्दल 5.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) स्वतः यासंदर्भात माहिती दिली. वाचा सविस्तर
अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्ससाठी CERT कडून 'क्रिटिकल वॉर्निंग'; तात्काळ मोबाईलमध्ये करा बदल
Indian Government Issues Warning: भारतामध्ये Android युजर्सची संख्या मोठी आहे. भारतासह जगभरातील कोट्यवधी स्मार्टफोन अँड्रॉई़़ड ऑपरेटिंग सिस्टिमवरच (OS) काम करतात. पण, याच अँड्रॉईड युजर्ससाठी केंद्र सरकारच्या वतीनं एक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलेली ही अॅडव्हायझरी Android OS Version 11, 12, 12L आणि 13 वर काम करणाऱ्या सर्व स्मार्टफोनच्या युजर्ससाठी आहे. वाचा सविस्तर
भारत-पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेची विशेष ट्रेन; रेल्वेकडून डिटेल्स जाहीर, पाहा कधी अन् कुठून सुटणार ट्रेन?
Special Train For IND vs PAK World Cup 2023: क्रिकेट विश्वचषकातील (World Cup 2023) टीम इंडिया (Team India) -पाकिस्तान (Pakistan) सामना बघण्यासाठी अहमदाबादला (Ahmedabad) जाण्यासाठी पश्चिम रेल्वेनं विशेष ट्रेन (Spacial Trains) चालवण्याची घोषणा केली. मात्र, काल पहिल्या विशेष ट्रेनची सर्व तिकिटं अवघ्या 17 मिनिटांत फुल्ल झाली. त्यामुळे मुंबईतील क्रिकेटप्रेमींचा तुफान प्रतिसाद पाहून पश्चिम रेल्वेनं दुसऱ्या स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. ही ट्रेन आज रात्री 11.20 वाजता मुंबई सेंट्रल इथून सुटणार असून उद्या सकाळी 7.20 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. या विश्वचषक स्पेशल ट्रेनची क्षमता 1531 आसनांची आहे. वाचा सविस्तर
13 October In History : प्रसिद्ध गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म, गायक किशोरकुमार यांचे निधन; आज इतिहासात
मुंबई : इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. या दिवसात काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या असतात. आजच्याच दिवशी सदाबहार गायक किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू आजही भारतीयांच्या हृदयावर राज्य करतो. त्यांचा अप्रतिम आवाज अनेकांच्या मनाची तार छेडतो.याच किशोर कुमार यांचं निधन 13 ऑक्टोबर 1987 रोजी झालं होतं. तर प्रसिद्ध सुफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची पायाभरणी झाली होती. मार्गारेट नोबेल उर्फ भगिनी निवेदिता यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते. वाचा सविस्तर
Horoscope Today 13 October 2023 : आजच्या शुभ योगामुळे 'या' राशी होणार श्रीमंत? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 13 October 2023 : 13 ऑक्टोबरचे राशीभविष्य असे दर्शवित आहे की, आज कन्या राशीत चंद्राच्या संक्रमणामुळे अनेक शुभ योग तयार होत आहेत. सूर्य आणि बुध एकत्र बुद्धादित्य योग तयार करत आहेत, तर चंद्र आणि बुध यांच्या संयोगाने धन योग तयार होत आहे. आणि सूर्यापासून पुढच्या घरात मंगळ असल्यामुळे वेशी योगही आज होत आहे. या ग्रह राशींच्या प्रभावामुळे शुक्र राशीच्या आणि सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. इतर सर्व राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य. वाचा सविस्तर