RBI Action on Paytm Payments Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला (Paytm Payments Bank) नो युवर कस्टमर (Know Your Customer) निकषांसह काही तरतुदींचं पालन न केल्याबद्दल 5.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) स्वतः यासंदर्भात माहिती दिली.     

  


सायबर सेफ्टी फ्रेमवर्कशी संबंधित काही त्रुटी बँकेमध्ये आढळूल्या            


रिझव्‍‌र्ह बँकेला असं आढळून आलं की, पेमेंट बँकांचं लायसन्स देण्यासाठी आरबीआयच्या गाईडलाईन्स, बँकांमधील सायबर सेफ्टी फ्रेमवर्क आणि UPI इकोसिस्टमसह मोबाईल बँकिंग अॅप्लिकेशन्स सुरक्षित करण्याशी संबंधित काही तरतुदींचं पूर्णपणे पालन करण्यात येत नव्हत्या, त्यामध्ये काही उणीवा होत्या.


ऑडिटर्सकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचं सर्वसमावेशक ऑडिट                         


अधिकृत वक्तव्यानुसार, बँकेच्या KYC/अँटी मनी लाँडरिंगच्या दृष्टीकोनातून विशेष तपासणी करण्यात आली आणि RBI द्वारे निवडलेल्या ऑडिटर्सकडून बँकेचं सर्वसमावेशक ऑडिट करण्यात आलं. आरबीआयच्या निवेदनानुसार, अहवालाची तपासणी केल्यानंतर असं आढळून आलं की, पेटीएम पेमेंट्स बँक पेमेंट सेवा प्रदान करण्याऱ्या संस्थांबाबत बेनेफिशयरीज ओळखू शकल्या नाहीत. 


RBI कडून पेटीएम पेमेंट्स बँकेला कारणे दाखवा नोटीस       


निवेदनात म्हटलं आहे की, बँकेनं पेमेंट ट्रांजेक्शन्सचं परीक्षण केलेलं नाही आणि पेमेंट सर्विसेजचा फायदा घेत असलेल्या संस्थांच्या जोखमीचं मूल्यांकनही केलेलं नाही. रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे की, "Paytm पेमेंट्स बँकेनं पेमेंट सेवांचा लाभ घेत असलेल्या काही ग्राहकांच्या आगाऊ खात्यांमध्ये दिवसाच्या शेवटच्या शिल्लक रकमेच्या नियामक मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे." यानंतर बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.


आरबीआयकडून बँकेला दंड             


पेटीएम पेमेंट्स बँकेकडून उत्तर मिळाल्यानंतर, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्याचा बँकेवरील आरोप सिद्ध झाला. त्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेवर आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, रिझर्व्ह बँकेनं केलेल्या कारवाईमुळे पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :                 


GST Authority Action on LIC: GST प्राधिकरणाकडून LIC वर कारवाई; तब्बल 36,844 रुपयांचा ठोठावला दंड