India On Israel-Hamas War:

  नवी दिल्ली इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. , भारताने हमासच्या हल्ल्याचे वर्णन दहशतवादी घटना असल्याचे केले आहे. तर, दुसरीकडे  पॅलेस्टाईनबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पॅलेस्टाईनच्या सार्वभौम आणि स्वतंत्र राज्याच्या स्थापनेला भारताने कायमच पाठिंबा दिला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी (12 ऑक्टोबर) सांगितले. इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताचे हेच धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


'पीटीआय' या वृत्तसंस्थे दिलेल्या वृत्तानुसार, बागची यांनी पॅलेस्टाईन समस्येवर द्विराष्ट्रीय तोडगा काढण्याच्या बाजूने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला, "यासंदर्भात भारताचे धोरण दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण आहे... भारताने नेहमीच इस्रायलशी सुरक्षित संबंध ठेवले आहेत. आणि मान्यताप्राप्त सीमांमध्ये सार्वभौम, स्वतंत्र आणि व्यवहार्य पॅलेस्टाईनच्या स्थापनेसाठी थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. यासोबतच त्यांनी इस्रायलशी शांततापूर्ण संबंधांचा पुरस्कार केला आहे. 


इस्रायल-हमास युद्धाबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करणे ही एक सार्वत्रिक जबाबदारी आहे आणि त्याचप्रमाणे दहशतवादाच्या धोक्याशी लढणे ही देखील जागतिक जबाबदारी आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे सुमारे 2,600 लोकांना प्राण गमवावे लागले आहे. 


पंतप्रधान मोदींनी नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली होती


तत्पूर्वी, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. या कठीण काळात भारतातील लोक त्यांच्या देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला.


भारताचे ऑपरेशन अजय 


इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरूच आहे. दोन्ही बाजूंनी आतापर्यंत तब्बल 2100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त आहे. अनेक भारतीयही इस्रायलमध्ये अडकले आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सांगितले की, इस्रायलमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय आहेत. तर, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताकडून आजपासून ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले आहे.


भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, सध्याची परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी करण्यात आला आहे. आपत्कालीन क्रमांक 1800118797, +91-11 23012113, +91-11-23014104, +91-11-23017905 आणि +919968291988 आहेत. तसेच ईमेल : Situnationroom@mea.gov.in असा आहे.  इस्रायलमधील भारतीय दूतावासाचे आपत्कालीन क्रमांक +972-35226748 आणि +972- 543278392 आहेत.