देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा लेखी आदेश, पोलीस अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासणार 


 मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Violence) चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) लेखी आदेश देण्यात आले आहे. मणिपूर हिंसाचाराप्रकरणी  पोलीस अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासणार  आहे. दोन महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करणार आहेत. (वाचा सविस्तर)


उत्तराखंडमध्ये पावसामुळे विध्वंस! दिल्लीपासून बिहारसह 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस


देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाला (Monsoon) सुरुवात झाली आहे. या पावसामुळे अनेकांचं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.(वाचा सविस्तर)


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेश दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचा शुभारंभ करणार


 पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे उद्या  रोजी मध्य प्रदेशचा (Madhya Pradesh) दौरा करणार आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ते दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी सागर जिल्ह्यात पोहोचतील. त्यानंतर दुपारी 3:15 च्या सुमारास ढाना येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील.  (वाचा सविस्तर)


पुणे, नाशिक, कोल्हापूरमध्ये आज एक लिटर पेट्रोलची किंमत काय? जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत


आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ होताना दिसत आहे. आज आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 0.17 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 86.55 डॉलरच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तसेच, डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा (WTI Crude Oil) दर 0.21 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 82.99 डॉलरवर पोहोचला आहे.  (वाचा सविस्तर)


 दिलासादायक! कांद्याच्या दरात सुधारणा होणार, सप्टेंबरमध्ये दर दुप्पट होण्याची शक्यता


 सध्या देशात टोमॅटोची लाली वाढल्याचं चित्र दिसत आहे. बाजारत टोमॅटोचे दर हे 150 ते  200 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. यानंतर आता कांद्याच्या दरात (Onion Price) देखील वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. (वाचा सविस्तर)


इंदिरा गांधी सरकारने श्रीलंकेला भेट दिलेल्या तामिळनाडूच्या कच्छातिवू बेटाचा वाद नेमका काय? मोदींचीही संसदेत जोरदार टीका


लोकसभेत मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावेळी कच्छातिवू बेटाचा संदर्भ आला आणि हा विषय पुन्हा चर्चेत आला. तामिळनाडूच्या मालकीचे कच्छातिवू बेट (Katchatheevu Island) हे काँग्रेसने श्रीलंकेला दिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. गेल्या महिन्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन (M.K. Stalin) यांनी पंतप्रधानांना पत्र लिहित श्रीलंकेसमोर कच्छातिवू बेटाचा विषय काढावा अशी मागणी केली होती.  (वाचा सविस्तर)


 18 वर्षाच्या खुदीराम बोसला फाशी दिली, दादरा आणि नगर हवेली भारतात विलिन; आज इतिहासात 


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अशा काही घटना घडल्या आहेत, अशा काही क्रांतिकारकांनी बलिदान दिलं आहे की ज्यामुळे स्वातंत्र्यलढ्याची दिशाच बदलून गेली. खुदीराम बोस हा त्यापैकीच एक क्रांतिकारक. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी, 11 ऑगस्ट रोजी हा किशोरवयीन क्रांतिकारक हातात गीता घेऊन फासावर चढला होता. (वाचा सविस्तर)


 मेष, सिंह, कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या आजचं राशीभविष्य


  आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तर तूळ राशीला  जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कन्या राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. एकूणच आजचा शुक्रवार मेष ते मीन राशीसाठी नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? (वाचा सविस्तर)