IMD Weather Update : देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाला (Monsoon) सुरुवात झाली आहे. या पावसामुळे अनेकांचं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.


आज, (11 ऑगस्ट रोजी) दिल्लीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, राष्ट्रीय राजधानीचे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. 12 ऑगस्ट रोजी हवामान चांगले असेल. त्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.


उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी 


उत्तर प्रदेशात हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो. IMD नुसार, 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान हलका पाऊस पडेल. उत्तराखंडमध्ये गेल्या महिन्यातही भरपूर पाऊस झाला होता, त्यामुळे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून, त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी हवामान विभागाने राज्यात पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.






15 ऑगस्टनंतर मुसळधार पाऊस पडणार


राजस्थानमध्ये या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती दिली आहे. पुढील एक आठवडा राजस्थानमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकीकडे राजस्थानची ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे मध्य प्रदेशात मात्र, पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 ऑगस्टनंतरच मध्य प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय.


'या' राज्यांमध्ये पाऊस पडणार


हवामान विभागाने राज्यातील काही भागांचा पावसाच्या धोरणाचा अभ्यास केला आहे. त्यानुसार, बिहार आणि झारखंडमध्येही पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय गुजरात, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगाल, ओरिसा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. या पावसामुळे नागरिकांमध्ये सतर्कता तसंच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे तुम्हीही घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा. 


महत्त्वाच्या बातम्या :


PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेश दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचा शुभारंभ करणार; कोटा-बिना रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार