Horoscope Today 11 August 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तर तूळ राशीला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कन्या राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. एकूणच आजचा शुक्रवार मेष ते मीन राशीसाठी नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्या कामात मदत करताना दिसेल. घरापासून दूर राहून स्पर्धेची तयारी करणाऱ्या तरुणांना आज आपल्या कुटुंबाची आठवण येईल. आज तुमची नोकरीत कामगिरी चांगली राहील. नोकरीत अधिकार्यांचे सहकार्य लाभेल, पण बदली होण्याचीही शक्यता आहे. आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार लोकांना आज नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. जे युवक कामाच्या शोधात फिरत आहेत, त्यांना मित्राच्या मदतीने रोजगार मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा असेल. आज तुमचे जास्त पैसे खर्च होऊ शकतात. पैशांचा जपून वापर करा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे घरापासून दूर काम करतायत त्यांना आपल्या कुटुंबीयांची आठवण येईल. आज तुमची जवळच्या मित्राशी भेट होईल. यामुळे तुमच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. आज व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आज नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. अनावश्यक वाद टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज तुम्हाला मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने, उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील उपलब्ध होतील, ज्यातून तुम्हाला फायदा होऊ शकेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते आज परत करा. तुमच्या मनातील काही गोष्टी आज पालकांबरोबर शेअर करा. तुमचं मन हलकं होईल. नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या लोकांना अपेक्षित नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज राजकारणात चांगला दिवस आहे. तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नक्कीच फलदायी आहे. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे लोक व्यवसायात बदलासाठी वरिष्ठांशी बोलतील. नोकरदार लोकांना नोकरीत बदल दिसतील. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळतील. आर्थिक सुखात वाढ होईल. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायात धनप्राप्ती होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. आज कोणताही निर्णय घाईत घेऊ नका.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करतायत ते व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. नवीन लोकांच्या संपर्कामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील उपलब्ध होतील. नोकरीत बढतीची संधी मिळेल. जोडीदाराच्या कामातील यशामुळे आज कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. घरोघरी पूजा, पाठ,पठण यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. बँकिंग क्षेत्रात यश मिळू शकते. तुमचे आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज घरातून बाहेर पडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडा. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आज शेजाऱ्यांच्या मदतीने उत्पन्नाच्या संधीही उपलब्ध होतील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, जेणेकरून तुमचे मन आवडत्या गोष्टीत रमेल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना चांगले फायदे मिळतील. व्यवसायात प्रगती दिसून येईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. नोकरीत नवीन जबाबदारीचा फायदा होईल. अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय पुढे नेण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आज व्यवसायाशी संबंधित कोणत्याही योजनांवर निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. आज आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुमची आवडती कामे करा. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरुन वाद होऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या समजुतीने सर्व काही ठीक कराल.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी काळ चांगला आहे, नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. आज तुमच्या जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बाहेर जाण्याचा विचारही कराल. घरातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा असेल, सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. आज तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. आज आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, तिथे थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न जास्त असेल. मित्रांच्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकाल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. आज तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, त्यात सर्व ओळखीच्या व्यक्तींची ये-जा सुरु राहील. आज कोणासाही पैसे उधारी म्हणून देऊ नका. तुम्हाला ते परत मिळतीलच याची शक्यता फार कमी आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून भरपूर नफा मिळेल. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्यालाही पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दबावामुळे आणि घरातील कलहामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे कामावर तुमची एकाग्रता दिसणार नाही. आज ज्येष्ठ सदस्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा, यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. भावा-बहिणींचेही पूर्ण सहकार्य मिळेल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. नवीन वाहनाचा आनंद मिळण्याचे संकेत आहेत. घर, फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर पालकांना खूप आनंद होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :