PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या ( 12 ऑगस्ट 2023) रोजी मध्य प्रदेशचा (Madhya Pradesh) दौरा करणार आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ते दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी सागर जिल्ह्यात पोहोचतील. त्यानंतर दुपारी 3:15 च्या सुमारास ढाना येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. 


11.25 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर श्री रविदासजी यांचे स्मारक


संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदासजी यांचे स्मारक 11.25 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर आणि 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून आकाराला येणार आहे. या भव्य स्मारकामध्ये संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी यांचे जीवन, तत्वज्ञान आणि शिकवण यांचे दर्शन घडवणारे एक प्रभावी कला संग्रहालय आणि दालन असणार आहे. स्मारकाला भेट देणाऱ्या भाविकांसाठी यात भक्त निवास, भोजनालय आदी सुविधा देण्यात येणार आहेत.


4000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार


पंतप्रधान कार्यक्रमादरम्यान, 4000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रेल्वे आणि रस्ते क्षेत्रातील प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. कोटा-बिना रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून, हा प्रकल्प पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. हा प्रकल्प अंदाजे 2 हजार 475 कोटींहून अधिक खर्चातून उभारला आहे. हा राजस्थानमधील कोटा आणि बारन आणि मध्य प्रदेशातील गुना, अशोकनगर आणि सागर जिल्ह्यातून जातो. अतिरिक्त रेल्वे मार्गामुळे चांगल्या वाहतुकीची क्षमता वाढेल आणि मार्गावरील रेल्वेगाड्यांचा वेग सुधारण्यासही मदत होईल.


1 हजार 580 कोटींहून अधिक खर्चाच्या दोन रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 हजार 580 कोटींहून अधिक खर्चाच्या दोन रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.  यामध्ये मोरीकोरी - विदिशा - हिनोतिया यांना जोडणारा चौपदरी रस्ता प्रकल्प आणि हिनोतिया ते मेहलुवा यांना जोडणारा रस्ता प्रकल्प यांचा समावेश आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


PM Modi On Rahul Gandhi : 'जशी अहंकाराने लंका जाळली होती तशीच त्यांची स्थिती झाली आहे', लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर घणाघात