देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Maharashtra Politics: महायुतीच्या जागावाटपाचं घोडं नेमकं कुठं अडतंय? महायुतीतील तिन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी


मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) नाशिक लोकसभेची (Nashik Lok Sabha) जागा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर ठाणे लोकसभेची (Thane Lok Sabha) जागा ही भाजपने मागितली आहे. लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या शिवसेनेच्या खासदार असणाऱ्या जागा भाजप आणि राष्ट्रवादीने मागितल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेवर दबाव तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा ठाणे आणि नाशिक जागा आपल्याकडेच राहावी यासाठी इतर दोघांवर दबाव तर तिसरीकडे राष्ट्रवादीकडून सातारा लोकसभेची मिळालेली जागा आपल्याकडेच राहावी यासाठी भाजपचा आपल्या इतर दोन मित्र पक्षांवर दबाव पाहायला मिळतोय. त्यामुळे अद्याप जागावाटप पूर्ण होऊ शकलेले नाही. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात दबावतंत्राचं राजकारण केलं जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. वाचा सविस्तर 


Elon Musk India Visit: एलन मस्क पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींची भेट घेणार, टेस्लासंदर्भात मोठ्या घोषणेची शक्यता


Tesla CEO Elon Musk India Visit : नवी दिल्ली : टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Tesla CEO Elon Musk) या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) भेटण्यासाठी भारताला भेट देणार आहेत. जिथे ते भारतात गुंतवणूक करण्याच्या आणि नवा कारखाना उघडण्याच्या त्यांच्या योजनांवर चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एलन मस्क (Elon Musk) 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात भारत दौऱ्यावर असतील. एलन मस्क नवी दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. वाचा सविस्तर 


सहावी, नववी आणि अकरावीसाठी 'नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क'; CBSE Board कडून लवकरच अंमलबजावणी, विद्यार्थ्यांसाठी फायदेच फायदे


CBSE Board Will Start National Credit Framework : नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 2024-25 शैक्षणिक सत्रापासून प्रायोगिक तत्त्वावर इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीसाठी 'राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क' लाँच करणार आहे. त्यासोबतच त्यांच्या संलग्न शाळांना त्यात सहभागी होण्यासाठी सीबीएसईनं आमंत्रित केलं आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात बुधवारी सविस्तर माहिती दिली. वाचा सविस्तर 


Maharashtra News : शेतकऱ्यांच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्याना मी सोडणार नाही; रविकांत तुपकर कडाडले, रोख नेमका कुणाकडे?


Maharashtra Buldhana Updates : बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana District) समृद्धी महामार्गाच (Samruddhi Mahamarg) बांधकाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतजमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पात शेतजमिनी गेल्यात. याच शेतकऱ्यांच्या नावावर काही नेत्यांनी कोट्यावधी रुपये हडप केल्याचा आरोप शेतकरी नेते आणि बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला आहे. या प्रस्थापितांशी माझी लढत असून यात मी जिंकणार असल्याचं तुपकर म्हणाले आहेत. मात्र, यामुळे पुन्हा समृद्धी महामार्ग चर्चेत आला असून 'ते' प्रस्थापित कोण? याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाचा सविस्तर


Munawar Faruqui : मुनव्वर फारुकीवर अंडी फेकून मारली, रेस्टोरंट्सच्या मालकाविरोधात केली तक्रार


Munawar Faruqui : 'बिग बॉस 17' चा विजेता असलेला, कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुनव्वर रेस्टोरंट्सच्या मालकाकडे पाहून ओरडत आहे. एका दाव्यानुसार, मुनव्वर फारूकीने 8 एप्रिल रोजीची ही घटना असून मुनव्वरवर अंडी फेकण्यात आली. मुनव्वरने या हॉटेलच्या मालकासह त्याच्या कर्मचाऱ्यांविरधात तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले जात आहे. वाचा सविस्तर 


Horoscope Today 11 April 2024 : कर्क, सिंह, कन्या, मीन राशीला मिळतील शुभ संकेत; इतर राशींसाठी दिवस फायद्याचा की तोट्याचा? वाचा गुरुवारचं राशीभविष्य


Horoscope Today 11 April 2024 : पंचांगानुसार, आजचा वार गुरुवार. आजचा दिवस काही राशींसाठी चांगला तर काही राशींसाठी आव्हानात्मक जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, राशीभविष्याच्या आधारे तुमचा एकंदरीत दिवस कसा जाईल हे ठरवता येतं. त्यानुसार, तुमच्या राशीत आज काय लिहीलंय? तुमच्यासाठी दिवसाची सुरुवात कशी असेल? हे जाणून घेण्यासाठी 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या... वाचा सविस्तर