Horoscope Today 11 April 2024 : पंचांगानुसार, आजचा वार गुरुवार. आजचा दिवस काही राशींसाठी चांगला तर काही राशींसाठी आव्हानात्मक जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, राशीभविष्याच्या आधारे तुमचा एकंदरीत दिवस कसा जाईल हे ठरवता येतं. त्यानुसार, तुमच्या राशीत आज काय लिहीलंय? तुमच्यासाठी दिवसाची सुरुवात कशी असेल? हे जाणून घेण्यासाठी 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या
मेष रास (Aries Horoscope Today)
आज मानसिक अस्वस्थता थोडी वाढणार आहे स्थावर इस्टेटिसंबंधी निर्माण झालेले प्रश्न जरा जास्त चिघळतील त्यामुळे त्यासंबंधीचे निर्णय लांबणीवर टाकलेले श्रेयस्कर होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
काही नवीन गोष्टी करण्याचा विचार कराल. स्वतःबद्दलच्या अवाजवी मोठ्या कल्पनांना थारा देऊ नका. महिलांना घरातील लोकांना समजून घ्यावे लागेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
स्वतंत्र वृत्तीमुळे अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नये. कोणतेही आर्थिक किंवा गुंतागुंतीचे निर्णय तडका फडकी न घेण्यातच तुमचा फायदा आहे.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज कष्ट करण्याच्या तुमच्या तयारीचा मात्र तुम्हाला फायदा होणार आहे. तुमची हुशारी आणि समय सूचकतेमुळे नोकरी धंद्यात रेंगाळलेल्या कामांना चालना मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल. ज्यांच्या अंगी उपजत कला आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल. काहीतरी नवीन करण्याची योजना अमलात आणाल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
वैवाहिक सौख्यामध्ये विश्वासाच्या नाजूक सूक्ष्मतंतूंनी सुखाचा गोफ विणला जाईल आणि मानसिक समाधान मिळेल. स्थावर इस्टेटिसंबंधीचे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकावे.
तुळ रास (Libra Horoscope Today)
आज कुठे एखादी गुंतवणूक करायची असेल तर ग्रहांची साथ चांगली मिळेल. फक्त तज्ञांचा सल्ला घेऊन पावले उचला. महिलांना समय सूचकतेमुळे फायदा मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
अध्यात्माची आवड असणाऱ्यांना आध्यात्मिक उन्नती साधेल. विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधण्यासाठी कष्टाला पर्याय नाही ही गोष्ट ध्यानात ठेवावी.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आज आत्मविश्वास चांगला राहील. व्यवहारात प्रत्येक वेळी सर्वस्व पणाला लावून झेप घ्यायची या वृत्तीला आज आवर घालावा लागेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आर्थिक बाबतीत अति व्यवहारी बनाल. आज जवळच्या लोकांचे थोडे ऐकून घ्यावे लागेल. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेलच असे नाही.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज अनेक ठिकाणच्या गोष्टी धीराने सांभाळून घ्यावे लागतील. काही नवीन कल्पनाही डोक्यात घोळतील. जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
जुनी येणी वसूल होतील आणि एखाद्या वेळी अचानक धनलाभाचेही योग येतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना मात्र सारासार विचार करावा.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: