देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Mumbai, Pune Air Quality: सुटकेचा निश्वास! मुंबई, पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी सुधारली, अवकाळीमुळे दोन्ही शहरं समाधानकारक श्रेणीत


Mumbai, Pune Air Quality: मुंबई : मुंबई (Mumbai News) आणि पुण्यातील (Pune News) हवा गुणवत्ता पातळीत सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल (गुरुवारी) मुंबईसह उपनगरांत आणि पुण्यातील काही भागांत कोसळलेला पाऊस फायदेशीर ठरल्याची माहिती मिळत आहे. काल झालेल्या पावसामुळे  मुंबई आणि पुणे हवा गुणवत्ता पातळीत समाधानकारक श्रेणीत आले आहेत. सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality) 94 वर तर पुण्यातील 82 वर आहे. वाचा सविस्तर 


India vs New Zealand Semi Final: "धोनी का, 2019 का, मॅनचेस्टर का, सबका बदला लेगा हमारा रोहित"; सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला चारीमुंड्या चीत करणार रोहितसेना


India vs New Zealand World Cup Semi Final 2023: बाप का... दादा का... भाई का... सबका बदला लेगा ये तेरा फैजल... बॉलिवूडमधला हा फेमस डायलॉग, पण सध्या टीम इंडियाच्या कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अगदी व्यवस्थित लागू होत आहे. वर्ल्डकप 2023 (World Cup 2023) च्या सुरुवातीपासूनच टीम इंडिया (Team India) फॉर्मात आहे. आतापर्यंत टीम इंडियानं वर्ल्डकप 2023 (ICC World Cup 2023) मध्ये एकही सामना गमावलेला नाही. सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. टीम इंडियानं दणक्यात सेमीफायनल्समध्ये (World Cup Semi Final) एन्ट्री घेतली आहे. आता सेमीफायनलमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात टक्कर होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियाची सेमीफायनलची लढत जवळपास ठरली आणि सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात काही कटू आठवणी जाग्या झाल्या. 2019 मध्ये धोनी रनआऊट झाल्याच्या कटू आठवणी सर्वांच्या मनात जाग्या झाल्यात. 2019 च्या मॅनचेस्टरमधील विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडन हरवलं होतं. वाचा सविस्तर 


Deepika Padukone Video : दीपिकाच्या So Elegant रीलने तोडले रेकॉर्ड, Tiger 3 च्या ट्रेलरपेक्षा मिळाले जास्त व्ह्युज


Deepika Padukone Viral Video: बॉलीवूडची लेडी स्टार दीपिका पदुकोणच्या एका इन्स्टाग्रामच्या रीलने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. तिचा सो एलिगंट, सो ब्युटिफूल हा व्हिडीओ (Deepika Padukone Just Looking A Wow Video) आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तिच्या याच व्हिडीओने आता आणखी एक रेकॉर्ड केला  आहे. दीपिका पदुकोणचा हा रील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडीओ ठरला आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला 185 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत इतकंच काय तर टायगर 3 चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षा जास्त व्ह्युज या व्हिडीओला मिळाले आहेत. वाचा सविस्तर 


10 November In History : छत्रपतींच्या पराक्रमाची गाथा! अफजलखानाचा वध, जागितक विज्ञान दिन; आज इतिहासात


मुंबई : देशात आणि जगभरात अनेक अशा घटना घडतात ज्यांची नंतरच्या काळात इतिहासात नोंद घेतली जाते. आजचा दिवस जागितक विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी आणि विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. चंद्रशेखर यांनी भारताचे आठवे पंतप्रधान म्हणून आजच्या (10 नोव्हेंबर) दिवशी शपथ घेतली होती. तर बिल गेट्स यांनी विंडोज 1.0 प्रकाशित केले होते. आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत, याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर 


Dhantrayodashi 2023 : आज धनत्रयोदशीला धन वृद्धि योग, सुख-समृद्धी वाढेल! देवी लक्ष्मी-कुबेर-धन्वंतरीच्या पूजेची शुभ वेळ, पद्धत, खरेदी मुहूर्त जाणून घ्या 


Dhantrayodashi 2023 : 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशीपासून पाच दिवसीय दिवाळी सण सुरू होईल. हा आनंदाचा उत्सव 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबीजपर्यंत सुरू राहणार आहे. 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळी आहे. धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी सोने, चांदी, वाहने, मालमत्ता इत्यादी खरेदी केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते आणि सुख-समृद्धी 13 पटीने वाढते. वाचा सविस्तर 


Horoscope Today 10 November 2023 : आज धनत्रयोदशी! कोणत्या राशींना लाभ होणार? सर्व राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या 


Horoscope Today 10 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या, वाचा सविस्तर