Deepika Padukone Viral Video: बॉलीवूडची लेडी स्टार दीपिका पदुकोणच्या एका इन्स्टाग्रामच्या रीलने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. तिचा सो एलिगंट, सो ब्युटिफूल हा व्हिडीओ (Deepika Padukone Just Looking A Wow Video) आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तिच्या याच व्हिडीओने आता आणखी एक रेकॉर्ड केला आहे. दीपिका पदुकोणचा हा रील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडीओ ठरला आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला 185 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत इतकंच काय तर टायगर 3 चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षा जास्त व्ह्युज या व्हिडीओला मिळाले आहेत.
दीपिकाचे इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. अलिकडेच तिने चाहत्यांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'जस्ट अ वॉव लूकिंग...' असं म्हणत दीपिकाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालता आहे. दीपिका पदुकोणचा हा रील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ ठरला आहे.
काही दिवसांपूर्वी दीपिकाने एक मजेदार व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने व्हायरल ट्रेंड 'जस्ट अ वॉव लूकिंग...' या ट्रेंडचा समाचार घेतला होता. या रीलवर दीपिकाच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या होत्या. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला आहे की आता हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला 185 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत, ही एक मोठी गोष्ट आहे. यासोबतच दीपिकाचा हा व्हिडीओ आता इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे.
ट्रोलिंग दरम्यान अभिनेत्रीने ही मजेशीर गोष्ट सांगितली
दीपिकाने तिच्यावर होणाऱ्या ट्रोलला सडेतोड उत्तर देण्यासाठी हा व्हिडीओ बनवला होता. वास्तविक, अलिकडेच दीपिका 'कॉफी विथ करण 8' मध्ये दिसली होती. यादरम्यान दीपिकाने रणवीरसोबतच्या तिच्या ओपन रिलेशनशिपबद्दल उघडपणे बोलले होते. तिने सांगितले की, 'सुरुवातीला ती रणवीर सिंगबद्दल गंभीर नव्हती. त्यावेळी मी एका वाईट नात्यातून बाहेर आलो होतो. त्यावेळी मला फक्त मजा करावीशी वाटली. यामुळे अभिनेत्रीला वाईटरित्या ट्रोल केले जाऊ लागले.
ही बातमी वाचा: