देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील


'मन की बात'चा शंभरावा भाग ऐतिहासिक बनवण्यासाठी जय्यत तयारी


पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या मन की बात  या रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग आहे. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी सरकार आणि भाजपने जोरदार तयारी केली आहे. 100 वा भाग आज सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. मन की बातच्या शंभराव्या भागापूर्वी एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे, ज्यामध्ये मन की बात कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करताना कोणती तयारी केली जाते हे दाखवण्यात आलं आहे. वाचा सविस्तर


पैलवानांच्या आंदोलनात मोदीविरोधी घोषणांबाबत बजरंग पुनियाचं स्पष्टीकरण


दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेल्या कुस्ती पैलवानांच्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. , त्यानंतर आता बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आंदोलकांना राजकीय फायद्यासाठी निषेध आणि प्रदर्शनाचे साधन म्हणून वापरु नका असा सल्ला कुस्तीपटूंनी दिला आहे. "भारतातील मुलींना न्याय मिळावा यासाठी मी लढा देत आहे, मात्र काही लोक या निषेधाला 'प्रक्षोभक आंदोलन' म्हणून मांडण्याचा किंवा ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत," असं कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटलं आहे. वाचा सविस्तर


केसेस काढून घेण्यासाठी अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी : प्रकाश आंबेडकर


केसेस काढून घेण्यासाठी अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बदलापूर इथे झालेल्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप, आरएसएसवर जोरदार टीका केली. सोबतच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसह बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. वाचा सविस्तर


मुस्लीम शिवसैनिकाला संपवणाऱ्या छोटा शकीलच्या घराजवळ शाखा


शिवसेनेत काम करतो म्हणून गँगस्टर छोटा शकीलने एका मुस्लीम शिवसेना शाखाप्रमुखाची हत्या केली होती. आता, त्याच छोटा शकीलच्या घराजवळ शिवसेना ठाकरे गटाची शाखा आहे. मुंबईत मुस्लीम बहुल वस्तीत शिवसेनेची ही शाखा असणे मुंबईतील राजकीय, सामाजिकदृष्ट्या चर्चेचा विषय ठरु लागला आहे. नागपाड्यातील शिवसेनेची शाखा लक्ष वेधून घेत आहे. वाचा सविस्तर


राजधानी दिल्लीसह देशातील 'या' राज्यात पावसाचा इशारा, उष्णतेपासून मिळणार दिलासा


देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे तर कुठे अवकाळी पावसाची बॅटिंग सुरु आहे. या अवकाळी पावसाचा अनेक ठिकाणी शेती पिकांना फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं राजधानी दिल्लीसह भारतातील इतर राज्यात पुन्ह अवकाळी पावासाचा इशारा दिला आहे. यामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. वाचा सविस्तर


कच्च्या तेलाचे दर पुन्हा उसळले; पेट्रोल-डिझेलच्या किमतींत बदल झाला?


पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत आज म्हणजेच, 30 एप्रिललाही कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. देशातील 16 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. तो प्रति बॅरल 80 डॉलरच्या पुढे गेला आहे. वाचा सविस्तर


गहू खरेदीत 42 टक्क्यांची वाढ, पंजाब हरियाणा आघाडीवर; काही भागात अवकाळीचा फटका 


देशभरात सध्या वातावरणात बदल होत आहे. अनेक राज्यात अवकाळी पावसासह गारपीट होत असल्याचे चित्र आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. सध्या शेतकरी गव्हाची काढणी करत आहेत. अशातच पाऊस आणि गारपीट होत असल्यानं पिकाचं नुकसान होत आहे. दरम्यान, सध्या अवकाळी पाऊस पडत असला तरी सरकारकडून गहू खरेदीला वेग आला आहे. मागील वर्षीपेक्षा गहू खरेदीत 42 लाख टनांची वाढ झाली आहे. वाचा सविस्तर


30 April In History: दादासाहेब फाळके यांचा जन्म, वर्ध्यात सेवाग्राम आश्रमाची स्थापना आणि हिटलरची आत्महत्या; आज दिवसभरात


आजचा दिवस भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्मदिन हा 30 एप्रिलचा. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेदेखील आजच्याच दिवशी जन्मले. भारतीय क्रिकेटचा कर्णधार रोहित शर्माचा जन्मही आजचाच. तर जर्मनीचा हुकूमशाह अॅडॉल्फ हिटलरने याच दिवशी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी. वाचा सविस्तर