Weather Update Today : देशातील हवामानात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे तर कुठे अवकाळी पावसाची बॅटिंग सुरु आहे. या अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) अनेक ठिकाणी शेती पिकांना फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं राजधानी दिल्लीसह (Delhi) भारतातील इतर राज्यात पुन्ह अवकाळी पावासाचा इशारा दिला आहे. यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार (IMD)उत्तर भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळं देशातील उत्तरेकडील राज्यांसह अनेक ठिकाणी वातावरण आल्हाददायक झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळं नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या. नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले होते. मात्र, आता या कडक उन्हापासून आणि दमट उकाड्यापासून सुटका होण्याची आशा आहे. अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हिमालयीन राज्यांमध्ये पावसासोबत हिमवर्षावही होऊ शकतो. उत्तरेकडील भागात जोरदार वाऱ्यासह पावसामुळे आयएमडीने ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. या दिवसांत केदारनाथ धाममध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांनाही तेथे सतत बर्फवृष्टीचा सामना करावा लागत आहे.
Rain : या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज
शनिवारी दिल्ली-एनसीआरसह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडला. त्यामुळं तापमानात घट झाली आहे. तिथे 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वातावरण आल्हाददायक झाले आहे. दुसरीकडं, रविवारीही दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाची शक्यता आहे. यासोबतच तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ, माहे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि किनारी कर्नाटकात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: