देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यायची की नाही? विधानसभा अध्यक्षांसमोर आज आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी 


 आमदार अपात्रतेप्रकरणी (Shiv Sena Mla Disqualification) आज विधानसभा अध्यक्षांसमोर  (Vidhan Parishad) सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे दाखल झालेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही यावर दोन्ही बाजूने मागील सुनावणीत युक्तिवाद झाला आहे. आज याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी की नाही ? यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.  (वाचा सविस्तर)


ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या, साकीनाका पोलिसांची कारवाई 


 ड्रग्ज माफिया ललित पाटील या प्रकरणात (Sasoon Hospital Drug Racket) आता नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ललित पाटीलला बेड्या ठोकल्यानंतर आता त्याच्या चालकाला मुंबई पोलिसांनी काल रात्री उशीरा अटक केली.   (वाचा सविस्तर)


Shilpa Shetty आणि Raj Kundra विभक्त? 'त्या' ट्वीटमुळे चाहते संभ्रमात


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या चर्चेत आहेत. 'सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान राजने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. याट्वीटनंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी वेगळे झाले का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  (वाचा सविस्तर)


'आम्ही सहकार्य करुच', पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी साधला संवाद


 इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्या सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (19 ऑक्टोबर) पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी गाझा येथील अल-अहली हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्फोटात प्राण गमावलेल्यांसाठी शोक देखील व्यक्त केला. तसेच या संबंधाबाबत त्यांनी भारताची भूमिका देखील स्पष्ट केली   (वाचा सविस्तर)


'ही राजा आणि प्रजेची लढाई', राहुल गांधींनी घेतली कोळसा खाणीतील कामगारांची भेट


तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तेलंगणातील सिंगरेनी कोळसा खाणीत (SCCL) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. काँग्रेसने (Congress) खासदार राहुल गांधी आणि कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.  (वाचा सविस्तर)


आता फक्त 14 दिवसात मिळणार किसान क्रेडीट कार्ड, 'ही'  आहे अंतिम तारीख


 शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्जही उपलब्ध करुन देत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) असणे आवश्यक आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. (वाचा सविस्तर)


20 October In History : चीनने भारतावर हल्ला केला, 1962 च्या युद्धाला तोंड फुटलं; आज इतिहासात 


 स्वतंत्र्य तिबेटचा लढा लढणाऱ्या दलाई लामांना तो लढा जिवंत ठेवण्यासाठी भारतात आश्रय घ्यावं लागलं होतं. दलाई लामांना भारताने आश्रय दिल्याचा राग चीनला होता. मग 'हिंदी चीनी भाई भाई' असा नारा देणाऱ्या भारताच्या पाठित खंजीर खुपण्याचं काम चीननं केलं. भारताच्या ध्यानीमनी नसताना चीनने 20 ऑक्टोबर 1962 रोजी हल्ला केला आणि 1962 च्या युद्धाला तोंड फुटलं. (वाचा सविस्तर)


Horoscope Today 20 October 2023 : मेष, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी वाद टाळावेत, 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या


 पंचांगानुसार 20 ऑक्टोबर 2023 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार वृषभ राशीच्या लोकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा भविष्यात काही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तर वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. इतर राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील?  (वाचा सविस्तर)