एक्स्प्लोर
Advertisement
पीएनबीचा दणका, ATM वरुन पाच वेळाच नि: शुल्क पैसे काढता येणार
पीएनबीच्या सेव्हिंग, करंट आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांना महिन्यातून पाचवेळाच एटीएमद्वारे नि: शुल्क पैसे काढता येणार आहेत. त्यानंतरच्या पुढील प्रत्येक व्यवहारांसाठी बँकेकडून 10 रुपये शुल्क आकारले जातील.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना एटीएमद्वारे महिन्यातून पाच वेळाच आर्थिक व्यवहार करण्याची मुभा दिली आहे. सध्या एटीएमवरुन व्यवहारावर बँकेकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पण 1 ऑक्टोंबरपासून ही सुविधा समाप्त होणार असून, पाच ट्रॅन्झॅक्शननंतर ग्राहकांना शुल्क द्यावे लागणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांसाठी एक नोटीस जारी करण्यात आली असून, त्यात म्हटलंय की, ''पीएनबी बँक एटीएमद्वारे मोफत व्यवहाराची संख्या आणि त्याचे लिमिट संपल्यानंतर आकरण्यात येणाऱ्या शुल्काच्या नियमांमध्ये बदल करत आहे. 1 ऑक्टोंबरपासून नवीन शुल्कदर लागू होतील.''
बँकेने पुढे स्पष्ट केलंय की, ''सेव्हिंग, करंट आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांसाठी महिन्यातून पाचपेक्षा अधिकवेळा एटीएमद्वारे पैसे काढल्यास, त्यानंतरच्या पुढील प्रत्येक व्यवहारांसाठी 10 रुपये शुल्क आकारले जातील. यात जरी पीएनबीच्या ग्राहकाने पीएनबीचं एटीएम वापरले असेल. तरीही त्यांना हे शुल्क आकारले जाईल.''
विशेष म्हणजे, ग्राहकांसाठी मोफत सीमेपेक्षा आधिकचे व्यवहार (एटीएमवरुन पैसे काढणे) आणि इतर व्यवहार ( मिनी स्टेटमेंट काढणे) यावरही शुल्क आकारले जातील, असंही बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, अकाऊंटवरील बॅलन्सची चौकशी, फंड ट्रान्सफर किंवा ग्रीन पिन रिक्वेस्ट सारख्या विनाशुल्क व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement