'या' तारखेला देशात मान्सूनचं आगमन होणार? महाराष्ट्रात कधी पडणार पाऊस? पंजाबराव डखांचा अंदाज काय?
हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी देशात कधी मान्सूनचं आगमन होणार? महाराष्ट्रात कधी पाऊस पडणार? याबाबतची माहिती दिलीय.
Panjabrao Dakh Weather Forecast : सध्या राज्यासह देशातील इतर भागात मोठ्या प्रमाणात तापमानात (Temperature) वाढ झालीय. अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यामुळं लोक मोठ्या आशेनं मान्सूनच्या (Mansoon) आगमनाची वाट बघत आहेत. मागील वर्षी देखील पुरेसा पाऊस (Rain) पडला नाही, त्यामुळं पाण्याची टंचाई भासत आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी देशात कधी मान्सूनचं आगमन होणार? महाराष्ट्रात कधी पाऊस पडणार? याबाबतची माहिती दिलीय.
यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होणार
नुकत्याच काही दिवसांपूर्वी हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी मान्सून संदर्भातील आपला पहिला अंदाज जारी केला होता. मान्सून 2024 मध्ये चांगला पाऊस राहणार असे त्यांनी म्हटले होते. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो. गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. यंदा मात्र उन्हाळ्यात फारसा पाऊस झालेला नाही, परिणामी पावसाळ्यात समाधानकारक असा पाऊस होणार असा अंदाज डख यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
22 मे ला मान्सूनचे अंदमानत आगमन होणार, तर महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास
पंजाबराव डख यांनी यंदा 22 मे ला मान्सूनचे अंदमानत आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे. तर महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास मोसमी पावसाला सुरुवात होणार असल्याचं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे. मात्र, राज्यात पेरणीयोग्य पावसाला 22 जूननंतर सुरुवात होईल अशी माहिती देखील डखांनी दिली आहे.
जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस होणार
25 ते 27 जून दरम्यान महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस होईल अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. तर जुनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होतील असा विश्वास पंजाबराव डखांनी व्यक्त केला आहे. यंदा जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस, ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होणार असे भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे. एकंदरीत पंजाबरावांनी यावर्षी खूपच चांगला मान्सून राहणार असा अंदाज दिला आहे.
11 मे पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात पूर्व मौसमी पावसाला पोषक परिस्थिती तयार होत आहे. पंजाबराव डखांनी म्हटल्याप्रमाणे आजपासून अर्थातच 7 मे पासून ते 11 मे 2024 पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पूर्व मौसमी पाऊस पाहायला मिळू शकतो. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भात गारपीट होण्याची देखील शक्यता देखील पंजाबराव डखांनी व्यक्त केली आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या: