एक्स्प्लोर

Paytm वापरणाऱ्या व्यवसायिकांची पैसे ट्रान्सफरची मर्यादा वाढवली

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयानंतर सध्या देशभरात सर्वत्र पेटीएमचा बोलबाला आहे. कॅशलेस व्यवहारासाठी दुकानदार आणि ग्राहक सर्वच पेटीएमचा वापर करत आहेत. त्यातच आता पेटीएमचा वापर करणाऱ्या व्यवसायिकांना कंपनीने आनंदाची बातमी दिली आहे. कारण आता प्रत्येक महिन्याला पेटीएम वापरणारा व्यवसायिक आपल्या मोबाईल वॉलेटच्या अकाऊंटमधून 25 हजारांऐवजी 50 हजारापर्यंतची रक्कम ट्रान्सफर करता येणार आहेत. यापूर्वी पेटीएमच्या वॉलेटमधून महिन्याला 25 हजार रुपयेच ट्रान्सफर करण्याची मर्यादा होती. त्यामुळे ज्यांचा व्यवसाय यापेक्षा अधिक आहे, त्या पेटीएम धारक व्यवसायिकांची पंचाईत होत होती. पण आता ही वाढवल्याने व्यवसायिकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय, व्यवसायिकांनी विक्री करुन कमावलेले पैसेही थेट त्या विक्रेत्याच्या बँक खात्यामध्ये 24 तासात जमा होणार आहेत. यासाठी पेटीएमचा वापर करणाऱ्या दुकानदाराला स्वत:ला मर्चेंट असल्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. पेटीएमचे अधिकारी दीपक एबिट यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानदार आणि मर्चेंटना नवीन उपाय उपलब्ध करुन दिले असून, संबंधित यूजर्सला सर्व माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर त्याची मर्यादा वाढवली जाऊन ती 50 हजार प्रति महिना करण्यात येणार आहे. शिवाय संबंधित दुकानदाराने विक्रीच्या माध्यमातून मिळवलेले पैसे 24 तासानंतर त्याच्या बँक खात्यावर जमा होतील, अशी व्यवस्थाही केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या व्यतिरिक्त ज्यांची उलाढाल 50 हजारापेक्षा अधिक असेल, त्यांना वेगळी प्रक्रीया करुन ती मर्यादा वाढवून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यानंतरच संबंधित व्यवसायिकाची मर्यादा वाढवली जाईल. सध्या पेटीएमचा वापर करणाऱ्या अनेक व्यवसायिकांचा व्यवसाय 25 हजार रुपयापर्यंत येऊन ठेपला आहे. त्यामुळे ही मर्यादा 50 हजारापर्यंत वाढवून 95 टक्के व्यवसायिकांना ग्राहक बनवण्याचा कंपनीचा मानस आहे, तसेच इतर पाच टक्क्यांसाठी वेगळ्या उपाय योजना करण्यात येणार असल्याचे दीपक एबिट यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
Karnataka Viral Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
Girish Mahajan  on Loksabha Election : लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde Full PC :आरोप करायला एवढा उशीर का? तुम्ही तिजोरी साफ केली;आम्हाला नालेसफाई करू द्याABP Majha Headlines : 03 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar Pune  :TOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
Karnataka Viral Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
Girish Mahajan  on Loksabha Election : लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
Sangli news : पाण्यासाठी रास्तारोको करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेतलं; रोहित पाटलांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
पाण्यासाठी रास्तारोको करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेतलं; रोहित पाटलांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
Anil Deshmukh on Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधून रसद; संजय राऊतांच्या आरोपांना आता विदर्भातील नेत्याकडून दुजोरा
नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधून रसद; संजय राऊतांच्या आरोपांना आता विदर्भातील नेत्याकडून दुजोरा
संजय राऊतांचं गडकरींसंदर्भातलं वक्तव्य म्हणजे, मूर्खपणाचा कळस : प्रविण दरेकर
चार जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल : प्रवीण दरेकर
Embed widget